Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलीवुडच्या क्वीनला हा टोमणा नक्कीच झोंबेल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 11:32 IST

अभिनेत्री कंगणा राणौत सध्या यशाच्या शिखरावर आहे. महिलाप्रधान सिनेमातील भूमिकांमुळे तिनं नवी उंची गाठलीय.. मात्र या यशामुळं कदाचित बॉलीवुडच्या ...

अभिनेत्री कंगणा राणौत सध्या यशाच्या शिखरावर आहे. महिलाप्रधान सिनेमातील भूमिकांमुळे तिनं नवी उंची गाठलीय.. मात्र या यशामुळं कदाचित बॉलीवुडच्या या क्वीनला नायकांची हिरोईन साकारणंही नकोसं वाटतंय. मग तो इरफान खानसारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा अभिनेता असला तरी.. बॉलीवुडच्या या क्वीनला दिग्दर्शक साई कबीर यांनी डिवाईन लव्हर्स या सिनेमात इरफानची नायिका साकारण्यासाठी विचारणा केली होती. मात्र आपल्याला सोलो लीड भूमिकांमध्येच रस असल्याचं सांगत कंगणानं ही भूमिका नाकारली. याच विषयी विचारलं असता इरफान खाननंही उपरोधिक उत्तर दिलं. कंगणा इतक्या उंचीवर पोहचली आहे की मी नायिका बनलो तरच तिच्यासोबत काम करु शकतो असं काहीसं अनोखं उत्तर इरफाननं दिलंय. एखादी चांगली स्क्रीप्ट आली ज्यात कंगणा नायकाची आणि मी नायिका, तर मी नक्की करेन असा टोमणा इरफाननं लगावलाय.