Join us  

'रोझ डे' च्या दिवशी कंगना रणौतला कोणी पाठवले गुलाब ? शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 3:54 PM

व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी कंगनाने सोशल मीडियावर गुलाबांच्या फुलांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी कंगना रणौत सध्या तिच्या डेटिंग लाइफमुळे चर्चेत आहे. अलिकडेच तिचे नाव निशांत पिट्टीसोबत जोडले गेले होते. त्यानंतर कंगनाने स्पष्टीकरण देत आपण  त्याला डेट करत नसल्याचे सांगितले होते. तसेच ती दुसऱ्या व्यक्तीला डेट करत असल्याचा खुलासाही तिनं केला होता. त्यामुळे ती कुणाला डेट करत आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यातच कंगनाने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी कंगनाने सोशल मीडियावर गुलाबांच्या फुलांचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत तिने हार्ट हे इमोजीही जोडलं आहे. कंगनाला गुलाब देऊन तिचा रोझ डे कोणी खास बनवला आहे. हे गुलाब कोणी पाठवले आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर काही चाहते कंगनाला हे गुलाब तिच्या बॉयफ्रेंडने पाठवले असल्याचं म्हणत आहेत.  सध्या सर्वत्र कंगना रनौत हिची चर्चा रंगली आहे.

दरम्यान कंगना आपल्या रिलेशनशीपमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. अभिनेत्रीचे हृतिकसोबतचे अफेअर आणि वाद सर्वश्रुत आहे. दोघांचेही प्रायव्हेट अफेअर चव्हाट्यावर आले होते. हृतिकने कंगनाला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती. आता पुन्हा एकदा कंगना खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.  अभिनेत्री कधी आणि कोणासोबत लग्न करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते आतूर आहेत. 

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्ल बोलायचे झाल्यास,  अलिकडेच तिचा ‘तेजस’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात कंगना 'पायलट'च्या भूमिकेत पाहायला मिळाली. तसेच ती  आता 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ती स्वतः करत आहे. यात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ती पॅन इंडिया सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटातही दिसणार असून या चित्रपटात आर माधवन तिच्यासोबत असणार आहे. 

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा