Join us
Daily Top 2Weekly Top 5

लिएंडर पेस-महेश भूपतिचा 'तो' वाद येणार समोर; 'ब्रेक पॉइंट' लवकरच रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 19:40 IST

Break point : टेनिस जगतातील सर्वाधिक चर्चित जोडी म्हणून कायम टेनिसपटू लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्याकडे पाहिलं जायचं.

ठळक मुद्देसीरिजच्या माध्यमातून लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

टेनिस जगतातील सर्वाधिक चर्चित जोडी म्हणून कायम टेनिसपटूलिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्याकडे पाहिलं जायचं. एकेकाळी या दोन्ही खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत देशाला  विजेतेपद मिळवून दिलं आहे. मात्र, कालांतराने काही कारणास्तव या दोघांमध्ये वाद झाले आणि या जोडीमध्ये फूट पडली. त्यांच्या याच वादावर, मैत्रीवर प्रकाश टाकणारा ब्रेक पॉइंट ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी या सीरिजचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

 ब्रेक पॉइंट  या सीरिजची निर्मिती अश्विनी अय्यर- तिवारी आणि नितेश तिवारी यांनी केली असून ही सीरिज ७ भागांची आहे. त्यामुळे सीरिजच्या माध्यमातून लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लिएंडर पेस आणि महेश भूपति हे दोघे दिसत असून या पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

"झी5 सारख्या घराघरात पोहोचलेल्या व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर अशा तऱ्हेच्या सीरिजला प्राधान्य मिळत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. महेश भूपति आणि लिएंडर सारख्या आयकॉन्ससोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता, असं अश्विनी अय्यर- तिवारी म्हणाल्या.

दरम्यान,1999 मध्ये चारही ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणारी महेश भूपति आणि लिएंडर  यांची पहिलीच दुहेरी टीम होती. 1952 नंतर प्रथमच असा विक्रम घडला होता. परंतु, मग ते नेमके कशामुळे वेगळे झाले? हे लवकरच झी 5 च्या येणाऱ्या 'ब्रेकपॉईंट' या मालिकेत या सगळ्याचा उलगडा होईल. 

टॅग्स :वेबसीरिजलिएंडर पेसटेनिस