Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पुरुष गायकांपेक्षा महिलांना…", प्रसिद्ध गायिकेनं केली इंडस्ट्रीची पोलखोल, काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:20 IST

"महिला कलाकारांना इथे...", लोकप्रिय गायिकेनं सांगितलं इंडस्ट्रीतील वास्तव, म्हणाली-"गेल्या १० वर्षात..."

Shereya Ghoshal: आपल्या सुरेल आवाजानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका म्हणजे श्रेया घोषाल. गोड गळ्याची 'मेलोडी क्विन' अशी तिची जगभर ख्याती आहे.श्रेयाने २००० मध्ये बॉलिवूडमध्ये प्ले बॅक सिंगर म्हणून पाऊल ठेवलं.संजय लीला भंसाळी यांच्या देवदास या चित्रपटातून श्रेयानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.'डोला रे डोला', 'सिलसिला ये चाहत का', 'चिकनी चमेली', 'तेरी मेरी', 'तेरे लिए' यांसारख्या सुपरहिट गाणी गाऊन तिने श्रोत्यांच्या मनावर वेगळी छाप उमटवली.गायिका श्रेया घोषाल सध्या तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. यादरम्यान, तिने इंडस्ट्रीतील भेदभावाबद्दल खुलासा केला आहे. 

अलिकडेच श्रेया घोषालने राज शमानी यांना मुलाखत दिली.या मुलाखतीत तिने बॉलिवूड इंडस्ट्रीतील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं.दरम्यान, श्रेया म्हणाली की,"जर आपण भारतीय संगीत क्षेत्राकडे नजर टाकली तर तिथे महिला गायकांनी गायलेली गाणी फार कमी दिसतात.टॉप १० गाण्यांची गोष्ट सोडूनच द्या. पण, टॉप ५० गाण्यांमध्येही ६ किंवा ७ गाणी अशी सापडतील फी-मेल सिंगर्सनी गायलेली असतात. यावरूनच लक्षात येतं की महिलांना संगीत क्षेत्रात मिळणाऱ्या संधी कमी झाल्या आहेत. ही परिस्थिती पूर्वी नव्हती,गेल्या काही वर्षांमध्ये हा बदल झाला आहे." तसंच गेल्या १० वर्षांपासून स्वत: श्रेया देखील इंडस्ट्रीतील या बदलाला सामोरी गेली आहे, असं तिने या मुलाखतीत सांगितलं.

याशिवाय, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे उदाहरण देताना श्रेया म्हणाली की,"त्या काळात या दोन्ही महान गायिकांचं इंडस्ट्रीत प्रचंड वर्चस्व होतं. त्यांची लोकप्रियता अनेक मोठ्या पुरुष गायकांपेक्षा जास्त होती. दरवर्षाला त्यांची कित्येक गाणी प्रदर्शित होत असत.त्या काळात महिलांच्या आवाजाला खूप महत्त्व दिलं जात असे.परंतु काळानुसार हे चित्र बदलत असल्याचं दिसून येत आहे."अशी खंत देखील गायिकेनं व्यक्त केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shreya Ghoshal exposes industry bias: Fewer songs for female singers.

Web Summary : Shreya Ghoshal reveals that female singers get fewer opportunities now compared to male singers in the music industry. She notes a decline from the era of Lata Mangeshkar and Asha Bhosle, where female voices dominated.
टॅग्स :श्रेया घोषालबॉलिवूडसेलिब्रिटी