Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या आयटम गर्लला काम मिळेना,आता बिकट परिस्थितीचा करावा लागतोय सामना हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 13:36 IST

बॉलिवूडमध्ये काही मोजक्या कलाकारांचे पाय जमिनीवर असून ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. मात्र हिच बाब प्रत्येकाला जमते असं नाही. ...

बॉलिवूडमध्ये काही मोजक्या कलाकारांचे पाय जमिनीवर असून ते यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. मात्र हिच बाब प्रत्येकाला जमते असं नाही. त्यामुळे बिकट परिस्थितीत  कलाकारांची दयनीय अवस्था होते. थोड्याशा यशाने हुरळून गेलेले कलाकार सुरुवाती यशानंतर लगेच गायब होतात.अशी अनेक उदाहरणं आहेत.ना त्यांची चर्चा होते ना त्यांना कोणतं काम मिळतं. अशीच काहीशी अवस्था सध्या  जलेबीबाई म्हणत साऱ्यांना थिरकण्यास भाग पाडणा-या मल्लिका शेरावतची झाली आहे...आयटम गर्ल अशी ओळख झालेली आणि मादक अदामुळे कायम चर्चेत राहणारी मल्लिका पुन्हा चर्चेत आली आहे.मल्लिकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या फोटोत बर्फाचा गोळा खात आपली भूक भागवताना दिसत आहे.मल्लिका आणि मुंबईच्या रस्त्यांवर बर्फाचा गोळा खात असल्याचे हा फोटो बघून सा-यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.कधीकाळी लोकांच्या मनावर राज्य करणारी मल्लिकाची आता अशी बिकट अवस्था झाल्याचे फोटोत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिला कोणीही तिला ओळखले नाही.तसेच मल्लिकाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून कुणी काम देतं का काम असं म्हणायची वेळ तिच्यावर आली असल्याच्याही चर्चा आहेत. बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे मल्लिका भोजपुरी सिनेमातही काम करण्यास झाल्याचे बातमीही आली होती.तुर्तास मल्लिकाचा हा फोटो तिने केलेला एक पब्लिसिटी स्टंट तर नाही ना अशाही चर्चा रंगत आहेत.मध्यंतरी मल्लिका आणि तिचा फ्रेन्च बॉयफ्रेन्ड साइरिल आॅक्जेनफेन्स या दोघांना त्यांच्या पॅरिसच्या घरमालकाने घरातून हाकलून दिल्याची बातमी  कानावर आली होती. घरमालकाच्या दाव्यानुसार, मल्लिकाने फक्त एकदाच 2715 यूरोचे भाडे दिले होते. त्यानंतर तिने एकही पैसा दिला नाही. अर्थात मल्लिकाने या बातम्या निराधार असल्याचे म्हटले होते.माझे पॅरिसमध्ये ना घर आहे ना मी तिथे भाड्याने राहते. मी लॉस एंजिल्समध्ये राहत होती आणि गेल्या आठ महिन्यांपासून भारतात आहे. तेव्हा उगाच पसरवू नका, असा खुलासा मल्लिकाने केला होता.