Join us

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानने करून दिले दोन विनोदवीरांचे ‘पॅचअप’; फोटो चर्चेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 17:45 IST

बॉलिवूडचा दबंग खान सलमानने त्यांची मैत्री पुन्हा जुळवली आहे. नुकतीच मुंबईत झालेल्या सोहेल खानच्या बर्थडे पार्टीत त्यांच्यातील सर्व मतभेद मिटवून त्यांचे पॅचअप करून दिले आहे.

छोटया पडद्यावरील लोकप्रिय विनोदवीर कोण असं कोणी विचारलं तर लगेचच आपल्या तोंडी दोन नावे येतात...ते म्हणजे कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर. ‘द कपिल शर्मा’ शोच्या मंचावरील त्यांची बाँडिंग सर्वांना आवडायची. पण, त्यांच्यात झालेल्या मतभेदांमुळे त्यांची मैत्री तुटली होती. पण, आता बॉलिवूडचा दबंग खान सलमानने त्यांची मैत्री पुन्हा जुळवली आहे. नुकतीच मुंबईत झालेल्या सोहेल खानच्या बर्थडे पार्टीत त्यांच्यातील सर्व मतभेद मिटवून त्यांचे पॅचअप करून दिले आहे.

कॉमेडीचे दोन प्रसिद्ध कलाकार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील भांडणे आता संपलेले दिसत आहे. झाले असे की, कपिल शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर सुनील ग्रोव्हर आणि सलमानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जो सोहेल खानच्या बर्थडे पार्टीमधील आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये कपिलने लिहिले, ‘ब्रदर्स नाइट.’ ज्याने हे स्पष्ट होत आहे की, कपिल आणि सुनील यांच्यामध्ये कोणताही वाद राहिलेला नाही.

छोटया पडद्याच्या वर्तुळात कित्येकदा अशी चर्चा होत असते की, सलमानने कपिल आणि सुनील यांचे पॅच अप करून दिले आहे. पण याचा कोणताही पुरावा समोर येत नव्हता. मात्र कपिलने हा फोटो शेअर केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, लवकरच हे दोघे पुन्हा एकदा सोबत कॉमेडी करताना दिसू शकतात.

सोहेलच्या बर्थडेला अनेक सेलिब्रिटी पार्टीमध्ये सामील झाले होते. यादरम्यानचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान आणि मीका सिंहने गाणे गाऊन सोहेलला बर्थडे विश केले. सोहेलच्या बर्थडेला झालेल्या पार्टीदरम्यान वत्सल सेठ, मंदाना करीमी, नंदिता मथानी, अतुल अग्निहोत्री सेलिब्रिटी दिसले होते.

टॅग्स :सलमान खानकपिल शर्मा सुनील ग्रोव्हरद कपिल शर्मा शो