Join us

बॉलिवूड सेलिब्रिटींचे ‘साईड बिझनेस’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 13:32 IST

अबोली कुलकर्णी  बॉलिवूड सेलिब्रिटींचे आयुष्य हे खरंच खूप चॅलेंजिंग असते. या चॅलेंजसोबतच त्यांच्या कामाचीही काही निश्चिती नसते. आता रोजीरोटी ...

अबोली कुलकर्णी  बॉलिवूड सेलिब्रिटींचे आयुष्य हे खरंच खूप चॅलेंजिंग असते. या चॅलेंजसोबतच त्यांच्या कामाचीही काही निश्चिती नसते. आता रोजीरोटी तर प्रत्येकालाच चालवायचीय. मग, स्पर्धा तर तितकीच दमदार असणार यात काही शंका नाही. तरीही भविष्यासाठी एक पर्याय म्हणून प्रत्येकच जण तेवढाच कॉन्शियस असतो. आपलं बॉलिवूडमधील प्रस्थ जर कमी झालं तर आपल्याकडे एक साईड बिझनेस असला पाहिजे. आज बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे अभिनयाबरोबरच त्यांचे इतर व्यवसायही सुरू ठेवतात. पाहूयात, कोण आहेत मग हे सेलिब्रिटी ज्यांच्याकडे अभिनयाशिवाय दुसरा पर्याय आहे.माधुरी दीक्षितआपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी दीक्षित एक चांगली नृत्यांगनाही आहे. नृत्याची हीच आवड तिने व्यवसायातही रुपांतरित केली. ‘धकधक गर्ल’ माधुरी एक आॅनलाइन डान्स अकॅडमी चालवते. या माध्यमातून नृत्याची आवड असणाºयांसाठी ती नृत्य शिकवते. सुनील शेट्टीसुनील शेट्टी हॉटेल व्यवसायात उतरला आहे. त्याशिवाय त्याची स्वत:ची निर्मितीसंस्था सुद्धा आहे. एका निर्मिती संस्थेअंतर्गत ‘खेल’, ‘रक्त’, ‘भागम भाग’ आणि ‘मिशन इस्तांबुल’ या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती.लारा दत्ताअभिनय क्षेत्रात सध्या लारा दत्ता सक्रिय नसली तरीही ती दुसऱ्याच एका कलात्मक क्षेत्रात सक्रिय आहे. एका  क्लोथिंग ब्रॅण्डच्या साथीने लाराने तिने साड्यांचं कलेक्शन लाँच केलं आहे. त्याशिवाय तिची स्वत:ची निर्मितीसंस्थाही आहे.अर्जुन रामपालअर्जुन रामपाल जितका चांगला अभिनेता आहे तितकाच चांगला व्यावसायिकही आहे. अर्जुनची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्याशिवाय दिल्लीत त्याचा रेस्तराँ सुद्धा आहे.मलायका अरोरा‘फिटनेस फ्रिक’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा फॅशन वेबसाइट चालवते. सुझान खान, बिपाशा बासू यांच्या साथीने मलायका एक वेबसाइट चालवते.