Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : अखेर... Nirbhayala न्याय मिळाला.... वाचा बॉलिवूड सेलिब्रेटींच्या प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 10:08 IST

निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी दिल्यानंतर अनेक स्तरातून याचं कौतुक आहे. 

 संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली  निर्भया प्रकरणातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला. विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता या चारही आरोपींना फासावर लटकवले. निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी दिल्यानंतर अनेक स्तरातून याचं कौतुक आहे. यावर बॉलिवूड सेलिब्रेटींनी ट्विट करुन आपलं मतं व्यक्त केले आहे. 

अखेर निर्भया प्रकरणाचा शेवट झाला. ही न्याय प्रक्रिया अजून वेगवान व्हायला हवी होती पण मला आनंद आहे की अखेर न्याय मिळाला. निर्भया आणि तिच्या आई-वडिलांना शांती मिळो. पुढे प्रिती म्हणते, 2012 साली जर न्याय मिळाला असता तर महिलांवरील किती तरी गुन्हे थांबले असते. 

तापसी पन्नूने ट्विट केले आहे की, अखेर शेवट झाला. मला अशा आहे की निर्भयाच्या आई-बाबांना आज अनेक वर्षांनी चांगली झोप लागेल. त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी लढाई होती. 

 

ऋषी कपूर हे या प्रकरणावर ट्विट करताना लिहितात, 'जैसी करनी वैसी भरनी'. बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तुम्हाला महिलांचा सन्मान करावाच लागेल. त्या लोकांना लाज वाटली पाहिजे ज्यांच्यामुळे आरोपींना शिक्षा देण्यास उशीरा झाला. जय हिंद ' अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.   

 

अभिनेता रितेश देशमुख यानेही ट्विट करुन निर्भयातील दोषींना फाशी दिल्याचं समाधान व्यक्त केलं आहे. रितेश देशमुखने ट्विटमध्ये म्हटलंय की, माझी सद्भावना आणि प्रार्थना निर्भयाचे पालक, मित्रपरिवारासोबत आहे. दिर्घ काळ आपल्याला वाट पाहावी लागली परंतु न्याय मिळाला असं त्याने सांगितले.

टॅग्स :निर्भया गॅंगरेपगुन्हेगारीतापसी पन्नूरितेश देशमुख