Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ही’ आहे बॉलिवूडची लेडी अंबानी; कमाईत अ‍ॅक्टर पतीलाही दिली मात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 18:33 IST

देणग्या गोळा करण्यासाठी ती वेळोवेळी ‘आराइश’ नावाने प्रदर्शनाचे आयोजन करीत असते. यामधून मिळणारा पैसा ती मुलींच्या आणि महिलांच्या अत्यावश्यक ...

देणग्या गोळा करण्यासाठी ती वेळोवेळी ‘आराइश’ नावाने प्रदर्शनाचे आयोजन करीत असते. यामधून मिळणारा पैसा ती मुलींच्या आणि महिलांच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी देते. होय, आम्ही बॉलिवूडच्या लेडी अंबानीविषयी सांगत आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही लेडी अंबानी नेमकी कोण? तर अभिनेता सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टीलाच लेडी अंबानी म्हणून आता ओळखले जात आहे. इंटरनेटवर उपलब्ध आकड्यांनुसार, सुनील शेट्टी वर्षाला सुमारे शंभर कोटी रुपयांची कमाई करतो. सद्यस्थितीत त्याच्याकडे एकापेक्षा एक कार, फ्लॅट, बाइक आणि रेस्टॉरंट आहेत. त्याव्यतिरिक्त त्याचे एक प्रॉडक्शन हाउसही आहे. मात्र हा सर्व व्याप माना शेट्टी बघत असल्याने या कमाईत तिचा खूप मोठा वाटा समजला जातो. त्यामुळे माना शेट्टीबद्दल सांगायचे झाल्यास कमाईच्या बाबतीत ती पती सुनील शेट्टीपेक्षाही एक पाऊल पुढे असल्याचे म्हटले जाते. माना आणि सुनील यांचा आंतरजातीय विवाह झाला आहे. सुरुवातीला त्याच्या लग्नात जातीवरून काहीसा अडथळा निर्माण झाला होता, परंतु सुनीलने त्याची परवा न करता मानाशी लग्न केले. दोघांच्या कामाविषयी सांगायचे झाल्यास सुनील शेट्टीने १९९२ मध्ये ‘बलवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. परंतु अशातही सुनील शेट्टी कमाईच्या बाबतीत पत्नीची बरोबरी करू शकला नाही. माना पती सुनीलसोबत मिळून एका मोठ्या रियल इस्टेट प्रोजेक्टवर सध्या काम करीत आहे. मुंबईतील एक उच्चभ्रू वस्तीत लक्झरी व्हिला बनविला जाणार आहे. सध्या दोघेही त्यावर मिळून काम करीत आहेत. माना या बिझनेसमध्ये सुनील शेट्टीची बरोबरीची पार्टनर आहे. तिचे वार्षिक उत्पन्न सुनील शेट्टीपेक्षाही जास्त आहे.