बॉलिवूड अभिनेत्यांच्या 'पॉवरबाज' पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:06 IST
ट्विंकल खन्ना : बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची कन्या. भलेही तिला चित्रपटात आपला प्रभाव टाकता आला ...
बॉलिवूड अभिनेत्यांच्या 'पॉवरबाज' पत्नी
ट्विंकल खन्ना : बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची कन्या. भलेही तिला चित्रपटात आपला प्रभाव टाकता आला नसला तरी ती अक्षय कुमारची उत्तम पत्नी बनली आहे. ती यशस्वी इंटेरियर डिझायनर, लेखिका आणि चित्रपट निर्माती आहे. तिचा वैयक्तिक ब्लॉगही गाजत असतो. गौरी खान : ज्यावेळी बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नीचा विषय येतो त्यावेळी आपसुकच गौरी खानचे नाव अग्रभागी असते. तीन मुलांची आई आणि किंग खानची प्रिय राणी असा जिचा गौरव होतो ती गौरी खान अत्यंत हुशार आणि सुंदर आहे. ती चित्रपट निर्माती देखील आहे. रेड चिली एंटरटेनमेंटची ती सहसंस्थापिका आहे. त्याशिवाय ती इंटेरियर डिझायनरदेखील आहे. तिने नुकतेच कपड्यांच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. सत्या पॉलसाठी तिने अँक्सेसरी कलेक्शनही केले आहे.किरण राव : केवळ मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानची पत्नी म्हणून किरण रावची ओळख नाही तर ती अत्यंत हुशार महिला आहे. त्याशिवाय चित्रपट दिग्दर्शिका, निर्माती आणि पटकथा लेखिकाही आहे.तिचा पहिला चित्रपट धोबी घाट हा समीक्षकांनी गौरविलाय. सरोगसीच्या माध्यमातून तिला मुलगा झाल्याचे सांगताना ती कचरत नाही.अधुना अख्तर : बंगाली पिता आणि इंग्लिश आईच्या पोटी जन्मलेली अधुना ही फरहान अख्तरची पत्नी आहे. ती नावाजलेली हेअर स्टायलिस्ट आहे. प्रत्येक रुक्ष स्थितीला बदलविण्याची तिच्यात ताकद आहे.मलाईका अरोरा-खान : खान फॅमिलीमध्ये लग्न होऊन येण्यापूर्वी मॉडेल, डान्सर आणि व्ही. जे असणार्या मलाईकाचे नाव सार्यांनाच माहितीय. अरबाज खानची पत्नी म्हणून अगदी छोट्यामोठय़ा समारंभात तिची उपस्थिती दर्शनीय असते. ती सध्या चाळीस वर्षाहून अधिक वयाची असली तरी फॅशनबाबतीत तिची असणारी जाणीव आणि तिने केलेले आयटम नंबर्स खूप गाजले आहेत.मान्यता दत्त : संजय दत्त प्रॉडक्शन हाऊसची ती सीईओ आहे. ती सामाजिक कार्यात सहभागी असते.सामाजिक चळवळींमध्ये ती सामील होते. जेलमध्ये असणार्या आपल्या पतीची काळजी घेण्याबरोबरच ती घरही सांभाळते. पडद्यावर त्यांचे पती जादू करतात परंतु घरात मात्र यांचीच जादू चालते. त्या हुशार आहेत, प्रभावशाली आहेत, त्याचपद्धतीने त्यांनी स्वत:चे वेगळे असे स्थानही निर्माण केलंय. त्या पतीवर अवलंबून नाहीत. आपल्या प्रतिभेच्या जोरावर जग पादाक्रांत करण्याची ताकद त्यांच्यात आहे. आम्ही गोष्ट करतोय बॉलिवूड गाजविलेल्या अभिनेत्यांच्या पत्नींबाबत. कोणकोण आहे या यादीत जरा बघा..