Join us
Daily Top 2Weekly Top 5

बी ग्रेड सिनेमात काम अन् करिअरला लागली उतरती कळा! अभिनेत्रीवर आली पश्चाताप करण्याची वेळ, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 17:02 IST

सुपरस्टारसोबत डेब्यू अन् बी ग्रेड सिनेमात काम करून केली घोडचूक; बॉलिवूड अभिनेत्रीवर आली पश्चाताप करण्याची वेळ, म्हणाली-"इंडस्ट्रीत लोकांनी मला..."

Bollywood Actress Zareen Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वीर या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण करून अभिनेत्री जरीन खान चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटाने तिच्यासाठी हिंदी सिनेसृष्टीचे दार खुले झाले. इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच तिची तुलना अभिनेत्री कतरिना कैफसोबत होऊ लागली. मात्र, त्यानंतर जरीनच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. आज जरीन हिंदी चित्रपटांमध्ये फार क्वचितच दिसते. तिचा शेवटचा प्रोजेक्ट देखील २०२१ मध्ये आला होता.

आता जरीन खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या करिअरविषयी भाष्य केलं आहे.'हेट स्टोरी ३' आणि 'अक्सर २' सारख्या चित्रपटांमुळे इंडस्ट्रीमध्ये तिला जज केलं गेलं, असं वक्तव्य तिने या मुलाखतीत केलं.  बी ग्रेड सिनेमात काम केल्यानं तिला कायम कमी लेखलं गेलं. त्यामुळे अभिनेत्रीवर पश्चाताप करण्याची वेळ आली. अलिकडेच पूजा भट्ट यांच्या पॉडकास्टमध्ये जरीन म्हणाली,"जेव्हा मी हेट स्टोरी ३ हा चित्रपट केला तेव्हा अनेक लोकांनी मला कमी लेखलं. त्यात  इंडस्ट्रीतील लोकही होते. ते म्हणायचे की हिला अभिनय करता येत नाही, म्हणूनच तिने तोकडे कपडे काढायला सुरुवात केली आहे."

झरीन पुढे 'अक्सर २' चित्रपटाबद्दल बोलली, चित्रपटाचे दिग्दर्शकांनी तिला आश्वासन दिलं होतं की "अक्सर २" हा चित्रपट "हेट स्टोरी ३" सारखा नसेल. त्यानंतर त्यांनी स्क्रिप्टही दिली. मात्र, प्रत्याक्षात चित्र काही वेगळंच होतं.ती म्हणाली,मी शूटिंग सेटवर पोहोचताच, त्यानंतरचा प्रत्येक दुसरा सीन एकतर किसींग सीन असायचा किंवा अचानक मला ब्रा किंवा तोक़ड्या कपड्यांमध्ये सीन करायला सांगितला जायचा."

मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, "माझी असे सीन्स करण्यात काही हरकत नाही, पण तुम्ही मला पूर्णपणे वेगळी स्क्रिप्ट दिली आहे. आता तुम्हाला त्यात असे सीन्स जोडायचे आहेत. मला जाणवलं की दिग्दर्शकाची यात चूक नसते. त्यांनी निर्मात्यांसमोर कथा मांडली. मला आणि माझ्या कॉस्च्युम डिझायनरला वेगळंच काही सांगण्यात आल. त्यामुळे सेटवर तणाव निर्माण झाला." असा खुलासा अभिनेत्रीने केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Zareen Khan regrets B-grade films, career decline, speaks out.

Web Summary : Zareen Khan faced career decline after 'Hate Story 3'. Judged for B-grade cinema, she regrets some roles. Directors misled her about explicit scenes, causing on-set tension.
टॅग्स :जरीन खानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा