Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडची ही अभिनेत्री तिसऱ्यांदा बनणार आई, बीचवर दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 18:21 IST

बॉलिवूडची ही अभिनेत्री बऱ्याचदा चर्चेत येत असते. तिला याआधी दोन मुले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री लीसा हेडन सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. लीसा हेडन नुकतीच खूप चर्चेत आली आहे. कारण ती तिसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे आणि तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यात ती बीचवर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. फोटोत लीसा बिकनीत दिसते आहे. काही तासातच शेअर केलेल्या फोटोला आतापर्यंत २५ हजारांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत.

लीसा हेडनचा हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर युजर्स तिला शुभेच्छा देत आहेत आणि कौतुक करत आहेत. लाटांमध्ये लीसाची पोझ कमाल वाटते आहे.

लीसाने आपला फोटो शेअर करत लिहिले की, जानेवारी, २०२१. लीसाचा हा फोटो जानेवारी २०२१ ला हॉंगकाँगमधील समुद्राच्या ठिकाणी क्लिक केला होता. मागील आठवड्यात लीसा हेडनने घोषणा केली होती की, येणाऱ्या जून महिन्यात तिच्या घरी छोटी परी येणार आहे.

लीसा हेडनने मागील आठवड्यात एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यात तिचा मुलगा जॅकदेखील दिसतो आहे. या व्हिडीओत लीसाने आपल्या मुलाला विचारले की, मम्माच्या पोटात काय आहे. त्यावर जॅक म्हणाला की, एक छोटी बहिण.

हा व्हिडीओ पोस्ट करत लीसाने लिहिले होते की, या जून महिन्यात येणार आहे.  लीसा हेडनला दोन मुले आहेत, ज्यांचे नाव जॅक आणि लियो आहे.

टॅग्स :लीसा हेडन