Join us

​रेशन धान्य खरेदी करतात बॉलिवूडच्या या अभिनेत्री !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 13:30 IST

बॉलिवूच्या आघाडीच्या काही दिग्गच अभिनेत्रींच्या नावे उत्तर प्रदेशातील फरुखाबाद शहरात रेशनकार्ड बनविण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे. त्यात जॅकलीन ...

बॉलिवूच्या आघाडीच्या काही दिग्गच अभिनेत्रींच्या नावे उत्तर प्रदेशातील फरुखाबाद शहरात रेशनकार्ड बनविण्यात आली असल्याचे उघडकीस आले आहे. त्यात जॅकलीन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा, राणी मुखर्जी आणि दीपिका पादुकोण यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रींच्या नावावर धान्यही खरेदी क रण्यात येते. अंत्योदय कार्ड धारकांची यादी पाहिल्यानंतर यात बॉलिवूडच्या या आघाडीच्या अभिनेत्रींचे नाव असल्याचे दिसून आले. त्यांच्या नावावर राशन दुकानामध्ये येणारे धान्यही उचलले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे जॅकलिन, राणी, सोनाक्षी आणि दीपिका या सर्वांचे लग्न झाल्याचे या कार्डावर दिसते. जॅकलिनच्या पतीचे नाव साधुलाल, दीपिकाच्या पतीचे नाव राकेशचंद्र, राणी मुखर्जीच्या पतीचे नाव रामरुप आणि सोनाक्षीच्या पतीचे नाव रमेशचंद्र असे कार्डावर नोंद आहे.गरीबांसाठी वाटण्यात येणाºया धान्याचा अशा प्रकारे खोटी रेशन कार्ड बनवून गैरवापर होत असल्याचा मामला यामुळे नजरेत आला आहे. आता या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे समजते.