Wamiqa Gabbi: बॉलिवूड अभिनेत्री वामिका गब्बी (Wamiqa Gabbi) सध्या तिच्या आगामी चित्रपट 'भूल चूक माफ' मुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. या चित्रपटात वामिका बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावसोबत (Rajkumar Rao)स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आपल्या दमदार अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी ही अभिनेत्री नव्या चित्रपटाच्या माध्यातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. गेल्यावर्षी वामिका गब्बी वरुण धवण स्टार बेबी जॉन या चित्रपटात झळकली. या चित्रपटानंतर अभिनेत्रीकडे बऱ्याच चित्रपटांची रांग लागली. परंतु बॉक्स ऑफिसवर बेबी जॉन चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. यावर पहिल्यांदाच वामिका गब्बी व्यक्त झाली आहे.
अलिकडेच वामिका गब्बीने 'भूल चूक माफ' या चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये 'बेबी जॉन' चित्रपटाविषयी भाष्य केलं. त्याबद्दल बोलताना वामिका म्हणाली, "मी 'बेबी जॉन' चित्रपटात माझा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं की प्रत्येकाने सर्वोत्तम दिलं. काही लोकांना हा चित्रपट आवडला तर काहींना नाही आवडला. अनेकांना असंही वाटत होतं की हा चित्रपट रिमेक आहे म्हणजे अगदी 'थेरी' चित्रपटासारखाच बनवला गेला आहे. परंतु तसं काहीच नव्हतं."
त्यानंतर पुढे वामिका म्हणाली,"'बेबी जॉन' हा चित्रपट अॅटली दिग्दर्शित 'थेरी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटलीने केले होते, तर हिंदी चित्रपटाची निर्मिती अॅटलीने केली होती. दोन्ही चित्रपटांमध्ये बरीच तुलना झाली, ज्यामध्ये लोकांना 'थेरी' जास्त आवडला. त्याचा परिणाम हा बेबी जॉन चित्रपटावर झाला." असं म्हणत अभिनेत्रीने बेबी जॉन च्या अपयशावर भाष्य केलं.
दरम्यान, करण शर्मा लिखित आणि दिग्दर्शित, ‘भूल चूक माफ’ या चित्रपटाचं कथानक दोन प्रेमी युगुलांवर आधारित आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहेत.