Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाळीशीच्या उंबरठ्यावर असताना बोहल्यावर चढणार बॉलिवूड अभिनेत्री, बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात करणार लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:01 IST

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हुमा कुरेशी लवकरच बॉयफ्रेंड रचित सिंहसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हुमा कुरेशी लवकरच बॉयफ्रेंड रचित सिंहसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हुमा कुरेशी आणि रचित एकमेकांना डेट करत आहेत. अमेरिकेत त्यांनी गुपचूप साखरपुडा केल्याच्याही चर्चा आहेत. आता त्यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांचे सोबती होण्याचा निर्णय घेतला आहे. 

'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, २०२६ च्या शेवटी हुमा कुरेशी आणि रचित सिंह लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. २०२६च्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ते लग्नाचं प्लॅनिंग करत आहेत. त्यांच्या घरी लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. अद्याप हुमा किंवा रचितने याबाबत ऑफिशियल काहीही सांगितलेलं नाही. मात्रा त्यांच्या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. पण हुमा कुरेशी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न करणार असून सेलिब्रिटींसाठी ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहे. 

हुमा कुरेशी ३९व्या वर्षी बोहल्यावर चढणार आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू होत्या. सप्टेंबर २०२५ मध्ये अमेरिकेत रचित सिंहने हुमाला फिल्मी स्टाइलने प्रपोज केल्याच्याही चर्चा होत्या. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातही ते दोघे एकत्र होते. आता ते लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दरम्यान, हुमा कुरेशी 'टॉक्झिक' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Huma Qureshi to marry boyfriend Rachit Singh at 40.

Web Summary : Bollywood actress Huma Qureshi is reportedly marrying her boyfriend, Rachit Singh, in late 2026. They have been dating for years and may have secretly gotten engaged in America. The wedding will be intimate, followed by a grand reception for celebrities.
टॅग्स :हुमा कुरेशीसेलिब्रिटी