Join us

भारताची पहिली 'मिस युनिव्हर्स'! सुपरहिट चित्रपट देऊनही आलेली काम मागण्याची वेळ; आता म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 10:25 IST

भारताची पहिली 'मिस युनिव्हर्स'! सुपरहिट चित्रपट देऊनही सुश्मितावर आलेली काम मागण्याची वेळ; खुलासा करत म्हणाली...

Sushmita Sen: भारताची पहिली 'मिस युनिव्हर्स' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सुश्मिता सेन हे अभिनय क्षेत्रातील देखील मोठं नाव आहे. अवघ्या १८ व्या वर्षी अभिनेत्रीने 'मिस युनिव्हर्स'चा खिताब जिंकला होता. त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली आणि बॉलिवूडमध्ये स्वत ला सिद्ध करुन दाखवलं. आजवर या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. अलिकडेच सुश्मिता सेनच्या 'ताली' या वेबसीरिजमुळे प्रचंड चर्चेत आली होती. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, या अभिनेत्रीच्या हाती सध्या एकही चित्रपट किंवा शो नव्हता. याबाबत एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने खदखद व्यक्त केली आहे.

अलिकडेच सुश्मिता सेनने 'मीड-डे' ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, ८ वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा होती, त्यामुळे मी अनेकांना फोन केले, असंही तिने सांगितलं. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, मी तेव्हा  अॅमोझॉन, नेटफ्लिक्स तसेच हॉटस्टारच्या हेडला फोन केले. मी त्यांना म्हणाले, माझं नाव सुष्मिता सेन आहे. मी एक कलाकार आहे आणि मला पुन्हा काम करायचं आहे. कारण, मी जवळपास आठ वर्ष काम केलं नव्हतं, तो काळ माझ्यासाठी खूप मोठा होता. 

यादरम्यान, अभिनेत्री म्हटलं, या ब्रेकमुळे तिला आयुष्य म्हणजे काय असतं हे अनुभवता आलं आणि प्रत्येक कलाकारासाठी ही  गोष्ट गरजेची असते. याच काळात सुश्मिताला हार्ट सर्जरी देखील करावी लागली होती. त्यानंतर तिने संपूर्ण लक्ष आपल्या आरोग्याकडे देण्यास सुरुवात केली.

सुश्मिता सेनच्या कामबद्दल बोलायचं झालं तर 'मैं हू ना', 'बीवी नं-१' आणि 'मैनें प्यार क्यों किया' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. शिवाय ताली वेबसीरिजमध्ये तिने साकारलेली गौरी सावंत देखील प्रेक्षकांना भावली. 

टॅग्स :सुश्मिता सेनबॉलिवूडसेलिब्रिटी