राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातात दुर्देवी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्याप्रमाणेच एका अभिनेत्रीनेचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. बॉलिवूड अभिनेत्री सौंदर्याच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तिच्या दुर्देवी मृत्यूनंतर बॉलिवूड हादरलं होतं.
अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम सिनेमामुळे सौंदर्या प्रसिद्धीझोतात आली होती. तिने अनेक कन्नड, तमिळ, हिंदी आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं होतं. अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचीही चाहत्यांना भुरळ होती. सौंदर्या राजकारणातही सक्रिय होती. तिने भाजपामध्ये प्रवेश करत तिच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. १७ एप्रिल २००४ रोजी एका रॅलीसाठी ती प्रायव्हेट विमानातून तेलंगणाला जात असताना तिच्या विमानाचा दुर्देवी अपघात झाला. विमान कोसळून त्याचा मोठा स्फोट झाला होता. हा अपघात इतका भयंकर होता की अभिनेत्री सौंदर्याचा त्यात जागीच मृत्यू झाला.
सौंदर्यासोबत विमानात तिचा भाऊ आणि अन्य दोन व्यक्ती होत्या. त्यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला होता. सगळ्यात हादरवणारी गोष्ट म्हणजे तेव्हा सौंदर्या ७ महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे तिच्या निधनानंतर चाहते हळहळले होते. २००३ मध्ये सौंदर्याने तिच्या बालपणीच्या मित्रासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर तिने अभिनयाला रामराम करत राजकारणाची वाट धरली होती. मृत्यू झाला तेव्हा तिचं वय केवळं ३१ वर्ष इतकं होतं.
Web Summary : Bollywood actress Soundarya, known for Suryavansham, died in a plane crash in 2004 while pregnant. The accident also killed her brother. She was 31.
Web Summary : सूर्यवंशम के लिए जानी जाने वाली बॉलीवुड अभिनेत्री सौंदर्या की 2004 में एक विमान दुर्घटना में मौत हो गई, उस समय वह गर्भवती थीं। हादसे में उनके भाई की भी मौत हो गई। वह 31 वर्ष की थीं।