Join us

आई अन् आजी सुपरस्टार! 'त्या' एका 'MMS'ने संपवलं अभिनेत्रीचं करिअर, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:53 IST

दिग्गज अभिनेत्रीची नात! एका 'MMS'ने उध्दवस्त झालं अभिनेत्रीचं करिअर

Riya Sen: बॉलिवूडमध्ये नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून दररोज असंख्य तरुण-तरुणी स्वप्ननगरी मुंबईत येत असतात. काहींना यश मिळतं, तर काही अपयशी होऊन घरी परत जातात. अशीच एक अभिनेत्री तिला करिअरमध्ये यश मिळालेली ओळख टिकवून ठेवता आली नाही. १९८८ मध्ये फाल्गुनी पाठकच्या याद पियॉं  की आने लगी या गाण्यातून रातोरात प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रिया सेन. त्यानंतर ती अनेक चित्रपट, संगीत व्हिडिओ आणि फॅशन शोमध्ये दिसली आहे.'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली खरी पण एका चुकीने अभिनेत्रीचं करिअर उद्धवस्त झालं. 

रिया सेनचा जन्म २४ जानेवारी १९८१ रोजी कोलकाता येथे झाला.फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली होती. हिंदीशिवाय ती बंगाली, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. रिया सेन राजघराण्यातील आहे. त्यांचे वडील भरत देव वर्मा त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. ते कूचबिहारच्या राजकुमारी इला देवी यांचा मुलगा आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचा पुतण्या होता. रियाची आई मुनमुन सेन आणि आजी सुचित्रा सेन या ज्येष्ठ अभिनेत्री होत्या.

'त्या' व्हिडीओमुळे सिनेसृष्टीपासून दुरावली...

अभिनेत्रीच्या एका व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. २००५ सालची गोष्ट आहे, जेव्हा रिया आणि अभिनेता अश्मित पटेल यांच्या अफेअरच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरू लागल्या होत्या. त्याचदरम्यान दोघांचा एक एमएमएम लीक झाला, त्यानंतर अनेक वाद झाले. रिया सेन आणि अश्मित पटेल दोघांनीही तो व्हिडीओ खोटा असल्याची प्रतिक्रिया दिली होती.असं म्हटलं जातं की एका फेक एमएमएसमुळे तिच्या आयुष्यात वादळ आलं की तिचं बॉलिवूड करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.

टॅग्स :रिया सेनबॉलिवूडसेलिब्रिटी