Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच सिनेमातून स्टार अन् लगेच केलं लग्न, बॉलिवूडच्या अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:47 IST

आत्याची 'ती' इच्छा अन् एका महिन्यातच अभिनेत्रीचं ठरलेलं लग्न,'त्या' निर्णयाबद्दल पहिल्यांदाच झाल्या व्यक्त, म्हणाल्या...

Actress Moushumi Chatterjee: १९७० आणि १९८० च्या दशकातील सर्वात आकर्षक आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाणाऱ्या अभिनेत्री मौसमी चॅटर्जी(Moushumi Chatterjee).एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या मौसमी अगदी कमी वयात चित्रपटसृष्टीत आल्या होत्या. प्रसिध्द गायक हेमंतकुमार यांना मौसमी आवडल्या आणि त्यांनी आपला मुलगा रितेशकरिता त्यांनी मौसमी यांच्या वडीलांसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मंजूरी मिळाल्यानंतर कोलकाता येथे विवाह संपन्न झाला. तर वयाच्या १७ व्या वर्षी त्या आई झाल्या. त्यानंतर मौसमी यांचं आयुष्यच बदलून गेलं. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसंच कमी वयात लग्न करण्यामागचं कारणंही सांगितलं.

१९७० च्या संपूर्ण दशकात, मौसमी चॅटर्जी हिंदी चित्रपटांमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी 'रोटी कपडा और मकान' (१९७४) या चित्रपटांमध्ये केलेल्या अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर नामांकन मिळाले.मौसमी यांनी चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्वच नायकांबरोबर काम केलं. अलिकडेच एनडीटीव्हीशी बोलताना मौसमी चॅटर्जी 
यांनी कमी वायतच लग्न का केलं याविषयी सांगितलं, त्या म्हणाल्या,"प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते. मी त्यावेळी दहावीत शिकत होते; परंतु 'बालिका वधू' चित्रपटानंतर माझा साखरपुडा झाला, आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे माझे सासरे हेमंत मुखर्जी हे त्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते. अशा प्रकारे दोन्ही कुटुंब एकत्र आली. त्यावेळी, प्रत्येकाला वाटत होतं की मी त्यांची सून व्हावे.प्रत्येकाला वाटत होते की मी त्यांची पत्नी व्हावं."

आत्याची ती इच्छा अन् लग्न केलं...

दरम्यान, मौसमी यांनी सांगितलं की. पहिलाच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना  लग्नासाठी प्रस्ताव येऊ लागले. केवळ आपल्या आत्याची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना लवकर लग्न करावं लागलं होतं, असं त्या म्हणाल्या. पुढे मौसमी म्हणाल्या,"ते खूपच विचित्र होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लांबच लांब रांगा असायच्या.त्यावेळी खूपच हट्टी आणि लाडावलेली होते. माझी मोठी आत्या आणि माझं खूप जमायचं. तिचा माझ्यावर खूप जीव होता. ती भवानीपूरला राहायची. जेव्हा आम्हाला तिच्या आजारपणाबद्दल कळलं तेव्हा ती कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात होती. तिने माझ्या सासऱ्यांचा हात धरला आणि म्हणाली, 'हेमंत बाबू, मी हिचं लग्न बघू शकेन का?"

अन् एका महिन्याच्या आत लग्न पार पडलं...

"आमच्या घरातली हे शेवटचं लग्नकार्य होतं, मीच घरातील सगळ्यात लहान मुलगी होते. तेव्हा माझे सासरे म्हणाले,'हो,तिचं लग्न नक्की पाहाल.'आणि एका महिन्याच्या आत आमचं लग्न पार पडलं."असा खुलासा मौसमी यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Moushumi Chatterjee: Early stardom, quick marriage, and the heartfelt reason.

Web Summary : Actress Moushumi Chatterjee revealed she married young to fulfill her aunt's dying wish after her debut film. Singer Hemant Kumar proposed marriage for his son, leading to a quick wedding and motherhood at 17, altering her life's course.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीलग्न