Kiara Advani Struggle: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) आपल्या अभिनय गुणांवर इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१४ मध्ये कबीर सदानंद यांच्या 'फगली' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाने व्यावसायिक यश फारसं मिळविलं नाही पण प्रेक्षकांनी यातील कियाराच्या अभिनयाची प्रशंसा केली. मात्र, या सिनेमानंतर तिला अधिक संघर्ष करावा लागला. यानंतर तिला भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याच्यावरील बायोपिक 'एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी'या चित्रपटातील महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी हिची भूमिका मिळाली. या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. मात्र, सुपरहिट चित्रपट देऊनही तिला बॉलिवूडमध्ये कामासाठी वणवण करावी लागली होती, असं तिनं सांगितलं.
राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना कियाराने तिच्या संघर्षकाळातील आठवणी शेअर केल्या. ती म्हणाली, "माझ्या कारकिर्दीतील तो कठीण काळच माझा सर्वात मोठा गुरु ठरला आहे. आजही लोकांना वाटतं की,'एमएस धोनी' किंवा 'कबीर सिंग'हे माझे पहिले चित्रपट होते. पण,माझा खरा प्रवास हा 'फगली' सिनेमापासून सुरु झाला आहे. कियारा म्हणाली की, 'फगली'च्या अपयशानंतर तिला कामाच्या फारशा संधी मिळाल्या नाही. तिच्या अभिनयाचे कौतुक झालं असलं तरी बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसवरील कमाईला जास्त प्राधान्य दिलं जातं."
पुढे कियाराने सांगितलं, माझ्या कामाचं कौतुक झालं पण, मला काम मिळालं नाही. मी पुन्हा ऑडिशन्स देऊ लागले आणि अनेक ठिकाणी मला नाकारण्यात आलं. कधीकधी मला अनेक महिने कामासाठी वाट पाहावी लागली.
'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'नंतरही कामासाठी वणवण...
'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सारख्या यशस्वी चित्रपटाचा भाग असूनही, कियाराचा संघर्ष संपला नव्हता. तिने खुलासा केला, 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि कबीर सिंग या दरम्यानच्या काळातील ती पाच वर्षे प्रचंड कठीण होती. मी असंख्य ऑडिशन्स दिल्या, नकार पचवले आणि काम मिळत राहील या आशेने काम करत राहिले."
मनीष मल्होत्रा आणि करण जौहरची मिळाली साथ
यावेळी कियाराने 'मशीन' चित्रपटादरम्यानचा एका किस्सा सांगितला. सोशल मीडियावर या चित्रपटाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं असलं तरी, त्याच चित्रपटातील 'तू चीज बड़ी है मस्त मस्त' या गाण्यामुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पण त्याच काळात तिची ओळख मनीष मल्होत्रा यांच्यासोबत झाली. तेव्हा मनीष मल्होत्रा यांच्या शिफारशीनंतर करण जोहरने कियाराची भेट घेतली आणि तिला 'लस्ट स्टोरीज' सिनेमाची ऑफर दिली. त्यानंतर कियाराच्या करिअरला कलाटणी मिळाली.
Web Summary : Despite 'Dhoni's' success, Kiara Advani faced struggles, giving auditions and facing rejections. Manish Malhotra and Karan Johar helped her career take off after 'Lust Stories'.
Web Summary : 'धोनी' की सफलता के बावजूद, कियारा आडवाणी को संघर्ष करना पड़ा, ऑडिशन दिए और अस्वीकृतियों का सामना किया। मनीष मल्होत्रा और करण जौहर ने 'लस्ट स्टोरीज' के बाद उनके करियर को उड़ान भरने में मदद की।