Isha Koppikar: हिंदी चित्रपटसृष्टीत 'खल्लास गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री इशा कोप्पिकर. १९९५ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होवून इशाने मिस टॅलेंटचा मुकुट प्राप्त केला. मॉडेलिंगच्या क्षेत्रातून तेलगू चित्रपट 'चंद्रलेखा' मधून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पणासाठी तिला २००० सालापर्यंत वाट पहावी लागली.हृतिक रोशन, करिश्मा कपूर यांच्या ‘फिजा’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटासृष्टीत पाऊल ठेवलं. तिचे 'गर्लफ्रेड', 'डी' , 'डार्लिंग' आणि 'शबरी'हे सिनेमे या सफल ठरले. सध्या एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे ईशा कोप्पिकर चर्चेत आली आहे.
हिंदी सिनेसृष्टीत सध्या कामाच्या तासांचा मुद्दा बराच चर्चेत आहे.संदीप रेड्डी वांगा यांच्या स्पिरिट चित्रपटातून दीपिका पादुकोणच्या एक्झिटनंतर हा मुद्दा समोर आला. अनेकांनी यावर आपली मतं मांडली. अशातच मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पिकरने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अलिकडेच बॉलिवूड बबलसोबत संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली," आमची शिफ्ट साधारण १२ तासांची असते. जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर सही करता तेव्हाच निर्मात्यांसोबत याबद्दल बोलणं गरजेचं आहे. जर निर्मात्याला तो कलाकार आपल्या सिनेमात घ्यायचं असेल तर त्याने त्याच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत. जर तसं जमणार नसेल तर तो कलाकार नक्कीच प्रोजेक्टमधून बाहेर पडेल. तुम्हाला एखादा कलाकार हवा असेल आणि त्याने तुमच्याप्रमाणेच काम करावं असं म्हणणं हे चुकीचं आहे. एखादा कलाकार तुमच्या मागणीनुसार काम करत असेल तर त्याच्याबरोबर काम करा. जर कोणी तुमच्या मागणीप्रमाणे काम करत नसेल, तर त्याला प्रोजेक्टमध्ये घेणं किंवा न घेणं हा सर्वोतपरी तुमचा निर्णय असतो. मला सुद्धा समजत नाही की नक्की अडचण काय आहे."
त्यानंतर अभिनेत्रीने म्हटलं,"ज्यांना खरोखर कामाची गरज असेल तर ते फक्त १२ तासच नाही तर १६ तासही काम करायला तयार होतील. त्यामुळे तुम्हाला जर अशी अभिनेत्री हवी असेल जी दिवसाला ८ तास काम करते आणि नंतर तिने १६ तास काम करावं, तर मुळात ही अपेक्षा चुकीची आहे. तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर तरी काम करा. या सगळ्यात कलाकराचा कोणताही दोष नाही. ही निर्मात्याची चूक आहे. तुम्हाला सिनेमात सुपरहिट हिरो हवा आहे. ते हिरो-हिरोइन त्यांच्या अटींवर काम करतात. यावेळी ईशा असंही म्हणाली की, "कोणाकडे जर काम नसेल तर तो कलाकार १० चित्रपट आले तरी ते करेल. जर त्याने तसं केलं नाही तर याचा अर्थ त्याला कामाची गरज नाही." असं मत अभिनेत्रीने मांडलं आहे.
Web Summary : Isha Koppikar discusses Bollywood's working hours debate, emphasizing artists' right to set terms. She highlights that producers wanting top talent must meet demands. Those desperately needing work may accept longer hours, but expecting more from sought-after actors is unfair.
Web Summary : ईशा कोप्पिकर ने बॉलीवुड के काम के घंटों पर बहस की, कलाकारों के शर्तों को निर्धारित करने के अधिकार पर जोर दिया। उन्होंने कहा कि शीर्ष प्रतिभा चाहने वाले निर्माताओं को मांगें पूरी करनी चाहिए। काम की सख्त जरूरत वाले लोग लंबे समय तक काम स्वीकार कर सकते हैं, लेकिन लोकप्रिय अभिनेताओं से अधिक अपेक्षा करना अनुचित है।