Join us  

कंगनाने भाजपात प्रवेश केल्यानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "काँग्रेसच्या नेत्यांनी तिच्याबद्दल..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 1:14 PM

बॉलिवूड क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतला लोकसभेटचं तिकीट देण्यात आलं आहे.

Hema Malini Reaction : लोकसभा निवडणूकांचं बिगुल वाजलं आहे. सेलिब्रिटींनी निवडणूकीच्या रिंगणात उतरणं यात काही नवीन नाही. अलिकडेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये बॉलिवूड क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतला लोकसभेटचं तिकीट देण्यात आलं आहे. अभिनय क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर कंगनाने आता राजकारणात एंट्री घेतली आहे. 

हिमाचल प्रदेशातील मंडीमधून अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांणा उधाण आलंय. त्यातच बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून लोकप्रिय असणाऱ्या हेमा मालिनी यांनी यावर भाष्य केलं आहे. कंगनाच्या राजकारणातील प्रवेशाबाबत हेमा मालिनी यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्याबद्दल हेमा मालिनी काय म्हणाल्या जाणून घेऊयात...

मुलाखाती दरम्यान हेमा मालिनी म्हणाल्या,  ''मी सुरूवातीला कंगनाला तिच्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाबाबत शुभेच्छा देते. कंगना एक उत्तम कलाकार आहे. आपल्या अस्तित्वासाठी ती संपूर्ण इंडस्ट्रीसोबत एकटी लढली. मला खात्री आहे की कंगना राजकारणातही चांगलं काम करेल. तिच्याबद्दल कॉंग्रेसच्या नेत्यांनी जे काही वक्तव्य केलंय ते फारच चुकीचं आहे''. असं देखील त्या म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :कंगना राणौतहेमा मालिनीलोकसभा निवडणूक २०२४भाजपाकाँग्रेस