Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आहे क्रिकेटमध्ये रस, बॅटिंग पाहून क्रिकेटर युवराज सिंग झाला थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 18:21 IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला क्रिकेटमध्ये रस असून ती महाराष्ट्राच्या टीममधूनही क्रिकेट खेळली आहे.

बऱ्याचदा कलाकारांना चित्रपटासाठी खेळांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. मात्र काही कलाकार असेदेखील आहेत. त्यांना अभिनयासोबतच खेळातही रुची आहे. या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री सैयामी खेर. तिनं अनेकदा क्रिकेटप्रेम व्यक्त केले आहे. पण ती उत्तम क्रिकेट खेळू शकते हे नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आलं आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतो आहे.

सैयामीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘नव्या वर्षात असं फ्रंट फुटवर जात आहे.’ सैयामीच्या या व्हिडीओवर भारतीय टीमचा ऑलराउंडर क्रिकेटर युवराज सिंगने कमेंट केली आहे. युवराजने ‘शानदार’ असे म्हणत तिच्या या शॉटचे कौतुक केले आहे. सैयामीने याआधी तिचा बॉलिंग करतानाचा व्हिडीओ सुद्धा शेअर केला होता.

मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजला असताना सैयामी युनिव्हर्सिटी क्रिकेट टीममधून क्रिकेट खेळत होती. पण पुढे मॉडेलिंगमुळे तिला क्रिकेट सोडावं लागलं. एका मुलाखतीत सैयामीनं ती नेहमीच क्रिकेट मॅच पाहत असल्याचं सांगितलं होतं.

सैयामीला फक्त क्रिकेटच नाही तर ती बॅडमिंटन खेळायलाही आवडचे.

तिनं बॅडमिंटनमध्ये ज्यूनिअर नॅशनल पर्यंत मजल मारली होती. ज्यात तिनं स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला टक्कर दिली होती आणि आजही ती आणि सायना एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रीणी आहेत. सैयामी जेव्हा मिर्जिया चित्रपटाचे शूट करत होती.

त्यावेळी माजी क्रिकेटर किरण मोरे त्यांच्या मुलीला भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी सैयामीच्या फिटनेसचं कौतुक करत अवघ्या दोन महिन्यांच्या ट्रेनिंगमध्ये ती क्रिकेट उत्तम प्रकारे खेळू शकेल असे म्हटले होते. याशिवाय सैयामी महाराष्ट्राच्या टीममधूनही क्रिकेट खेळली आहे.

टॅग्स :संयमी खेरयुवराज सिंग