Join us

"तो साधा असल्याचं नाटक करायचा", प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने केली अक्षय कुमारची पोलखोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:08 IST

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री गुड्डी मारुतीने तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

Guddi Maruti : बॉलिवूडचा 'खिलाडी' कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या प्रोफेशनश व्यतिरिक्त पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. अभिनेत्याचं नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. याबाबत अभिनेत्री गुड्डी मारुतीने (Guddi Maruti) खुलासा केला आहे.

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री गुड्डी मारुतीने तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अक्षय कुमार तसेच गोविंदा यांसारख्या बड्या कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली. 'खिलाडी' या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केलं आहे. नुकतीच अभिनेत्री सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार बाबतीत खुलासे केले आहेत. दरम्यान, मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, "खिलाडी' चित्रपट करताना अक्षयची जबरदस्त फॅन फॉलोइंग होती. सेटवर अक्षयचा मस्तीखोर अंदाज असायचा. त्यावेळी त्याच्या बऱ्याच गर्लफ्रेंड्स होत्या. मला फक्त त्यातील काही माहिती होत्या. परंतु त्याने नक्की किती मुलींना डेट केलंय? याबद्दल मला काही माहिती नाही".

पुढे अभिनेत्रीने सांगितलं, "अक्षय कुमारसोबत काम करुन खूप अनुभव मिळाला. त्यावेळी अक्षयला मुली हार्टब्रेकर म्हणायच्या. तो फक्त तेव्हा साधाभोळा बनण्याचं नाटक करायचा. मग नंतर आम्हाला त्याच्याविषयी बऱ्याच गोष्टी कानावर आल्या". असं अभिनेत्री म्हणाली.

अभिनेत्री गुड्डी मारुतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने   ‘खिलाडी’, ‘शोला और शबनम’, ‘आशिक आवारा’, ‘दुल्हे राजा’ आणि ‘बीवी नं १’ यांसारख्या अनेक चित्रपटात तिने काम केलं आहे.

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसेलिब्रिटी