Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिनिलीयाने बोलून दाखवली वेब सीरिजमध्ये झळकण्याची इच्छा, म्हणाली- "मला ओटीटीवर काम करायला आवडेल, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:31 IST

महाराष्ट्राची लाडकी वहिनी असलेल्या जिनिलीयाला आता ओटीटीवर काम करायचं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयाने वेब सीरिजमध्ये काम करायची इच्छा बोलून दाखवली आहे.

जिनिलीया देशमुख ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. साऊथ सिनेमांपासून अभिनयाला सुरुवात केलेल्या जिनिलीयाने बॉलिवूडमध्येही ठसा उमटवला. महाराष्ट्राची लाडकी वहिनी असलेल्या जिनिलीयाला आता ओटीटीवर काम करायचं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयाने वेब सीरिजमध्ये काम करायची इच्छा बोलून दाखवली आहे.

"मला ओटीटीवर काम करायला आवडेल. शॉर्ट किंवा लाँग...फॉरमेट कोणताही असो माझ्या चाहत्यांपर्यंत तो कंटेट कसा पोहोचवायचा हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझी पर्सनालिटी अशी आहे की मी कोणत्याही प्रकारची भूमिका साकारू शकते. काम हे काम आहे. मी खूप आधीपासूनच साऊथ सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. साऊथ सिनेमांत काम करायला मिळालं याचा मला अभिमान आहे", असं जिनिलीया IANS ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

पुढे ती म्हणाली, "मी बॉलिवूड आणि साऊथच्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मी सिनेमांना एक माध्यम म्हणून बघते. काम करण्यासाठी मी नेहमीच उत्साहित असते. मी खूप वेळापासून एका चांगल्या कामाची वाट पाहत आहे". दरम्यान, जिनिलीया आणि रितेश देशमुख हे महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी आहेत. सिनेसृष्टीतील आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना दोन मुलं आहेत.

टॅग्स :जेनेलिया डिसूजासेलिब्रिटी