Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडच्या या अभिनेत्री आहेत कार्तिक आर्यनच्या 'कोकी पूछेगा' शोच्या फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 16:52 IST

कार्तिक आर्यनच्या युट्यूबवरील चॅट शो 'कोकी पूछेगा'ने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे.

कार्तिक आर्यनच्या युट्यूबवरील चॅट शो 'कोकी पूछेगा'ने सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. शोचा पहिला एपिसोड वीकेंडला कार्तिकने त्याच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज केला होता. ज्यात तो गुजरातमधील पहिली कोरोना व्हायरस सर्व्हायवर सुमीती सिंगसोबत बोलताना दिसत होते. त्याच्या या पहिल्या एपिसोडने फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही तर कोरोनाशी निगडीत गोष्टींची माहितीदेखील रसिकांना मिळाली. त्याच्या या शोला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. सामान्य लोकांसोबतच बॉलिवूडच्या अभिनेत्री आलिया भटजान्हवी कपूरनेदेखील त्याच्या या शोची प्रशंसा केली आहे.

जान्हवीने कार्तिकच्या इंस्टाग्रामवर कमेंट करीत लिहिले की,खूप चांगले कोकीजी. याची खूप गरज होती. कार्तिकने दोस्ताना 2मधील त्याची कोस्टारला उत्तरात सांगितले की, जी जे जी. गरजेचे आहे. कार्तिकच्या चाहत्यांना चांगलेच माहित आहे की कार्तिक जान्हवीला जे असं संबोधतो.

आलिया भटनेदेखील कार्तिकच्या शोचे कौतूक केले. ती म्हणाली की, किती चांगला शो आहे. कार्तिकने तिला रिप्लाय देताना तिचे आभार मानले आणि दुसऱ्या गेस्टबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, धन्यवाद. फ्रंटलायनर्ससोबत बोलायला खूप छान वाटलं. पुढील एपिसोड एका प्रेरणादायी डॉक्टरसोबत असणार आहे.

भारतात जेव्हापासून कोरोनाचे संकट आले आहे. तेव्हापासून कार्तिक सातत्याने कोरोनाबद्दल लोकांमध्ये जनजागृती पसरविण्याचे काम करत आहे. कार्तिकचे चाहते   'कोकी पूछेगा' या शोचा पुढील एपिसोडची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :कार्तिक आर्यनजान्हवी कपूरआलिया भट