Ek Chatur Naar : बॉक्स ऑफिसवर सध्या नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेगळे कथानक असलेले, अनेक विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता लवकरच अशाच आगळ्या वेगळ्या विषयावर आधारित 'एक चतुर नार' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टी -सिरिजची निर्मिती असलेल्या या चित्रपटात दिव्या खोसला कुमार आणि नील नितीश मुकेश यांची प्रमुख भूमिका आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमधील दिव्या आणि निल नितीन मुकेशच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
T-Series फिल्म्सच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवर 'एक चतुर नार' चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. पहिल्या पोस्टरमध्ये दिव्या खोसला कुमार आणि नील नितीन मुकेश टेबलाजवळ उभे असलेले पाहायला मिळतायत. तर टेबलावर टोमॅटो आणि शिमला मिरची अशा भाज्या दिसत आहेत. शिवाय दिव्या चाकूने गाजर कापत असताना धूर्त नजरेने पाहत आहे. तर बाजूलाच नील नितीन मुकेश हातात बंदूक घेऊन उभा आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये दिव्याने डोळ्यांना गॉगल लावून धांसू अंदाजात पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे नील घाबरलेला दिसतो आहे. कॉमेडी आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे.
टी-सिरीजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उमेश शुक्ला यांच्या खांद्यावर आहे. हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये छाया कदम, रजनीश डुग्गल, सुशांत सिंग तसेच यशपाल शर्मा अशी तगडी स्टारकास्ट आहे.