Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रचंड छळ आणि वाईट वागणूक! 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला झाला मोठा मनस्ताप; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 17:16 IST

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करुन मोठा संताप व्यक्त केलाय. काय घडलंय नेमकं?

अनेकदा बॉलिवूडमधील कलाकारांना प्रवास करताना वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं. हा अनुभव हे कलाकार सोशल मीडियावर शेअर करत असतात. बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्रीला एका मनस्तापजनक प्रकाराला सामोरं जावं लागलंय. ही अभिनेत्री म्हणजे दिव्या दत्ता. दिव्याने सोशल मीडियावर याविषयी पोस्ट लिहून तिला आलेला विचित्र अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय. काय घडलंय नेमकं?

दिव्याने सोशल मीडियावर  शेअर केला अनुभव

दिव्या दत्ताने सोशल मीडियावर एअरलाईन्सविषयी आलेला अनुभव शेअर केलाय. दिव्या लिहिते, "सकाळी सकाळी हा वाईट अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद. कोणतीही आगाऊ सूचना न देता फ्लाईट रद्द करण्यात आली. इथे एकही स्टाफ नाहीय जो तुम्हाला याची माहिती देईल. हा एक प्रकारचा छळ आहे. बाहेर जाण्याच्या मार्गावर कोणीही कर्मचारी उपलब्ध नाही. प्रवाश्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जातेय. मला या गोष्टीचा खूप त्रास झालाय. यामुळे माझ्या कामावरही परिणाम झालाय."

 

दिव्या दत्ताला चाहत्यांनी केला सपोर्ट

दिव्याने पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी तिला सपोर्ट केलाय. याशिवाय एअरलाईन्सच्या भोंगळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केलीय. दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आपण तिला 'भाग मिल्खा भाग', 'बदलापूर', 'ब्लॅकमेल' अशा सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. दिव्या अनेकदा वेबसीरिज आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसते. आशयघन आणि संवेदनशील भूमिका करण्यात दिव्याचा हातखंडा आहे.

टॅग्स :दिव्या दत्ताबॉलिवूड