Nushrat Bharucha: 'प्यार का पंचनामा', 'सोनू के टीटू की स्वीटी' यांसांरख्या चित्रपटांमुळे अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) प्रसिद्धीझोतात आली. सध्या अभिनेत्री छोरी-२ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचं सगळे कौतुक करताना दिसत आहेत. दरम्यान, नुसरत तिच्या चित्रपटांसह सोशल मीडियावर देखील तिच्या फोटो, व्हिडीओंमुळे चर्चेत येत असते. सध्या अभिनेत्रीने एका मुलखतीमध्ये नेपोटिझमवर केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्याचं लक्ष वेधून घेतलंय.
नुकतीच नुसरत भरुचाने शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान, अभिनेत्री म्हणाली, "मी त्यांना नेपो किड्स म्हणणार नाही कारण मला तो शब्द आवडत नाही. मी खरं सांगते आहे, मला ते तसं वाटत नाही. मला वाटतं तुम्ही ही एक कलाकार आहात. तुम्ही देखील संघर्ष करत इथपर्यंत पोहोचला आहात, तुमच्यावर सुद्धा जबाबदाऱ्या आहेत. हो, फक्त त्यांना संधी सहज मिळते आणि मार्ग सापडतात जे आम्हाला मिळत नाहीत."
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली," ते अशा ठिकाणी पोहोचू शकतात जिथे आम्ही पोहोचू शकत नाही. ते अशा ठिकाणी दार ठोठावू शकतात जिथे ज्याचा आम्हाला पत्ताही माहित नसतो.समजा मला या निर्माता दिग्दर्शकाला भेटायचे आहे, तर मला त्याचा नंबर कोण देईल किंवा मला त्याचा ऑफिसचा पत्ता कुठून मिळेल? मी कोणाला विचारू? ही एक गंभीर समस्या आहे. पण ती खरी गोष्ट आहे. जेव्हा मी प्यार का पंचनामा केला आणि मला एका दिग्दर्शकाला मेसेज करावा लागला, तेव्हा मी नंबर कुठून आणायचा? मला त्याचा पत्ता कुठून मिळेल? असे प्रश्न मनात निर्माण झाले होते."
दिग्दर्शक कबीर सिंग यांच्या भेटीचा किस्सा सांगत नुसरत म्हणाली, 'दिग्दर्शक कबीर खान इंडस्ट्रीतील खूप मोठं नाव आहे. पण त्यावेळी ते उत्तर देतील की नाही याबद्दल मला माहिती नव्हतं पण तरीही मी त्यांना मेसेज केला. त्यावर त्यांनी लगेचच रिप्लाय केला. कबीर खान सरांकडून उत्तर मिळाल्यावर मी प्रचंड आनंदी होते. त्यानंतर त्यांनी मला भेटायलाही बोलावले. मी त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले सर, तुम्ही दिलेल्या उत्तराने मी खूप प्रभावित झाले आहे." असा खुलासा अभिनेत्रीने केला.