Join us

'बेबी जॉन'नंतर वामिका गब्बी दिसणार 'या' नव्या चित्रपटात; साउथ स्टार अदिवी शेषसोबत करणार स्क्रीन शेअर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:58 IST

अभिनेत्री वामिका गब्बी (Wamiqua Gabbi) सध्या 'बेबी जॉन' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.

Wamiqa Gabbi: अभिनेत्री वामिका गब्बी (Wamiqua Gabbi) सध्या 'बेबी जॉन' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर वामीकाने प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. इतकंच नव्हे तर लोक तिची तुलना ऐश्वर्या रायसोबत करु लागले आहेत. दरम्यान, वामिका 'बेबी जॉन' नंतर नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विनय कुमार सिरीगिनीदी दिग्दर्शित 'जी-२' या स्पाय थ्रिलर सिनेमात ती अदिवी शेषसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 

नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या नवीन पोस्टरवर वामिका आणि अदिवी शेष काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार 'जी-२' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.  युरोपमध्ये या चित्रपटाचे काही सीन्स शूट करण्यात आले आहेत. 'जी-२' मध्ये वामिका-आदिवी शेषसह इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबत मुरली शर्मा, सुप्रिया यारलगड्डा यांसारखी तगडी स्टारकास्ट चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'जी-२' हा सिनेमा हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मळ्यालम या चार भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. 

वामीका गब्बीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर 'जुबली', 'खुफिया' तसेच 'चार्ली चोपडा अ‍ॅंड द मिस्ट्री ऑफ सोलंग व्हॅली' या वेबसीरिजमध्ये ती झळकली आहे. शिवाय अलिकडेच ती 'बेबी जॉन' चित्रपटात ती दिसली. 

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमासोशल मीडिया