Archana Puran Singh:बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अर्चना हिने चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन केलं. आपल्या विनोदी शैलीने आणि सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने आयुष्यात वाईट काळ देखील पाहिला आहे.
अर्चना पूरण सिंगचा स्वत:चा एक युट्यूब चॅनेल आहे. अभिनेत्री अनेकदा त्यावर वेगवेगळे व्लॉग शेअर करत असते. त्यामाध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसते.अलिकडेच, एका व्लॉगमध्ये अभिनेत्रीने तिचा गर्भपात झाला त्यावेळी प्रसंग शेअर केला आहे. मात्र, यावेळी काही कारणास्तव त्यांचे पती परमीत सेठी सोबत नव्हते, याची खंत अभिनेत्रीने यावेळी व्यक्त केली. या व्लॉगमध्ये अर्चना पूरण सिंग यांनी सांगितलं, लग्नानंतर चार वर्षांनी त्या गरोदर राहिल्या होत्या.पण, त्यांचं मिसकॅरेज झालं. त्या कठीण काळाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली," मी गरोदर होते परंतु एका चित्रपटाच्या सेटवर काम करत असताना माझा गर्भपात झाला.मला मूल हवं होतं. पण, गर्भपात झाल्याने मी पूर्णपणे तुटले होते."
अर्चना यांना त्या परिस्थितीत पाहून परमीत सेठी प्रचंड दुखावले गेले होते. पुढे त्या प्रसंगाबद्दल बोलताना ते म्हणाले," तू ज्या परिस्थितीतून जात होतीस ते पाहून मला वाटलं की आपल्याला मुले हवीच,असं काही नव्हतं. मला तुझ्या सोबतीची गरज होती. मग अर्चना म्हणाल्या, मला आठवतंय तू म्हणाला होतास आपण दोघे एकमेकांच्या इतके जवळ आहोत की आपल्याला आयुष्यात तिसऱ्या कोणाचीही गरज नाही.मात्र माझी याला सहमती नव्हती. मी म्हटलं होतं की ते मूल कोणीही बाहेरचं नसेल, तो आपलाच आयुष्याचा एक भाग असेल." शूटिंगदरम्यान गर्भपात झाला अन्...
‘ऐसी भी क्या जल्दी है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अर्चना यांचा गर्भपात झाला होता. या अनुभवानंतर अभिनेत्री प्रचंड घाबरली होती, असे तिने या व्लॉगमध्ये म्हटलं आहे. त्या म्हणाली, "मी तेव्हा ३४ वर्षांची होते आणि त्या प्रसंगानंतर मला खरोखरच असं वाटू लागलं होतं की मी कधीही आई होऊ शकणार नाही." असा भावुक करणारा प्रसंग अभिनेत्रीने सांगितला.
Web Summary : Archana Puran Singh shared a painful experience of miscarriage during a film shoot. She was devastated as she wanted a child. Her husband, Parmeet, was supportive, prioritizing her well-being. She feared she might never become a mother.
Web Summary : अर्चना पूरन सिंह ने फिल्म की शूटिंग के दौरान गर्भपात का दर्दनाक अनुभव साझा किया। बच्चा चाहने के कारण वह तबाह हो गई थीं। उनके पति, परमीत ने उनका साथ दिया और उनकी भलाई को प्राथमिकता दी। उन्हें डर था कि वह कभी मां नहीं बन पाएंगी।