Join us
Daily Top 2Weekly Top 5

'द केरळ स्टोरी २'मध्ये अदा शर्मा का नाही? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"त्याच्याबद्दल बोलणं, म्हणजे…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:50 IST

'द केरळ स्टोरी'च्या दुसऱ्या भागात अदा शर्मा का नाही? अभिनेत्री म्हणाली-"आता यावर सार्वजनिकरित्या बोलणं..."

Adah Sharma: अभिनेत्री अदा शर्मा ही हिंदी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तब्बल १५ वर्षांच्या संघर्षानंतर सुदिप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी या या चित्रपटाने अदा शर्माला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. दरम्यान, नुकताच द केरळ स्टोरी २ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी चित्रपटात जुन्या स्टारकास्टऐवजी नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री अदिती भाटिया आणि उल्का गुप्ता यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री अदा शर्मा या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात नसल्यामुळे चाहते निराश झाले आहेत.यावर आता स्वत:अदाने प्रतिक्रिया दिली आहे.

२०२३ मध्ये खळबळ माजवणाऱ्या 'द केरळ स्टोरी'च्या यशानंतर, आता त्याचा सीक्वल म्हणजेच 'द केरळ स्टोरी २' सिनेमालाही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. परंत, अभिनेत्री अदा शर्मा या भागात नसल्याने अनेकजण यावर तर्कवितर्क लावत आहेत. मात्र,आता खुद्द अदा शर्माने यावर प्रतिक्रिया दिली आहे.  एका मुलाखतीत अदा शर्मा म्हणाली,"या चित्रपटाबद्दल बोलताना मला कायमच आनंद होतो कारण मीही याचा एक भाग होते. आता दुसऱ्या भागात मी नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे चर्चेत येण्यासारखं आहे."

यापुढे अभिनेत्री म्हणाली,"मला या चित्रपटाच्या सीक्वलची ऑफर मिळाली की नाही ही माझी आणि निर्मात्यांमधील गोष्ट आहे. मला यावर बोलायचं नाही. चित्रपटाचा पहिला भाग हा अफगानिस्तानातील आयएसआयएस कॅप्मवर आधारित आहे. ज्यामध्ये  एक साधी मुलगी कशी आतंकवादी बनते, असं दाखवण्यात आलं आहे. तर या चित्रपटाचा दुसरा भाग पूर्णपणे वेगळा आहे."

माझ्यावर प्रेक्षक प्रेम करतात, त्यामुळेच...

मग या मुलाखतीत अदा प्रेक्षकांबद्दल म्हणाली,"माझ्यावर तसेच मी साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षक खूप प्रेम करतात. त्यामुळे प्रत्येक सिनेमात मी असावी, असं त्यांना वाटतं. अगदी माझा पहिला चित्रपट १९९२ ते आता केरल स्टोरी पर्यंत  त्यांनी मला प्रत्येक भूमिकेत स्विकारलं आहे." 

English
हिंदी सारांश
Web Title : 'The Kerala Story 2': Adah Sharma Reveals Reason for Absence

Web Summary : Adah Sharma clarifies her absence from 'The Kerala Story 2,' stating it's between her and the producers. She values audience's love.
टॅग्स :अदा शर्माबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा