Join us

‘आपला माणूस’च्या रिमेकमध्ये दिसणार बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री? जाणून घ्या कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 13:10 IST

मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आपला माणूस’ नाना पाटेकर यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे चर्चेत राहिला. बॉक्स आॅफिसवर देखील चित्रपटाने चांगलाच गल्ला जमविला. ...

मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आपला माणूस’ नाना पाटेकर यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे चर्चेत राहिला. बॉक्स आॅफिसवर देखील चित्रपटाने चांगलाच गल्ला जमविला. चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मध्यंतरी या चित्रपटाचा हिंदी रिमेक काढायचा अशी चर्चा सुरू झाली होती. यात करिना कपूर खान हिला घ्यायचे असे देखील ठरले. मात्र, आता नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा ही आता या हिंदी रिमेकचा भाग असणार आहे, असे कळते आहे. करिना कपूर खानला बाजूला सारून आता सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात भूमिका गाजवणार असे दिसते आहे. सोनाक्षी सिन्हाला ही चित्रपटाचे कथानक प्रचंड आवडले असून तिने स्वत:हून यासाठी पुढाकार घेतल्याचे कळतेय. दरम्यान, करिना कपूर खान हिलाही मराठी चित्रपट 'आपला माणूस'च्या हिंदी रिमेकची स्क्रिप्ट आवडली होती. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की, ती या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. आशुतोष गोवारिकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मात्र, आता परिस्थिती बदलली असून सोनाक्षी सिन्हा आता या चित्रपटाचा भाग बनणार असून ती सूनेच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. ‘आपला माणूस’ची गोष्ट एक वडील, मुलगा आणि सून ह्याच्या नात्यावर आधारित आहे. सुनेमुळे आपले आणि आपल्या मुलाचे नाते दुरावत चालले आहे असे वडिलांना वाटत असते. नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका हे या कौटुंबिक, सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे खास वैशिष्ट्य आहे. सुमित राघवन, इरावती हर्षे यांच्याही प्रमुख आणि लक्षवेधी भूमिका या सिनेमात आहेत. विवेक बेळे यांच्या ‘काटकोन त्रिकोण’ नाटकावर आधारित असलेल्या या सिनेमाची कथा रसिकांनी डोक्यावर घेतली. सिनेमाला मिळालेले यश पाहून अभिनव शुक्ला, रोहित चौधरी, मनीष मिश्रा हे निर्माते अक्षरक्ष भारावून गेले आहेत. त्यामुळेच की काय 'आपला मानूस' या सिनेमाचा सिक्वेल आणण्याची त्यांची इच्छा आहे. आपला मानूस सिनेमाला अभूतपूर्व यश मिळाले. शिवाय त्याची कथा रसिकांच्या काळजाला भिडणारी होती असं अभिनव शुक्लाने म्हटले आहे.