Zayed Khan on Mother Hindu Funeral: बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते संजय खान यांच्यासह संपूर्ण खान कुटुंबियांसाठी मागचं वर्ष फारच कठीण गेलं. गतवर्षी संजय खान यांची पत्नी जरीन खान यांचं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. जरीन खान यांच्या निधनानंतर त्यांच्या हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यामुळे खान कुटुंबियांवर टीकाही झाली होती. मुस्लिम असूनही हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का केले असे सवालही काहींनी तेव्हा उपस्थित केले होते. या सगळ्यावर जरीन यांचा मुलगा अभिनेता जायेद खानने प्रतिक्रिया देत मौन सोडलं आहे.
जरीन खान यांचं ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानीनिधन झालं. हृतिक रोशनची एक्स वाईफ ही सुझैन खान ही त्यांची मुलगी आहे. तर जायेद खान हा त्यांचा मुलगा आहे. पारसी कुटुंबात जन्मलेल्या जरीन यांनी आंतरधर्मील विवाह केला होता. अलिकडेच अभिनेता जायेद खानने झुमला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आईच्या अंत्यसंस्काराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ही जरीन खान यांची शेवटची इच्छा होती,असं त्याने यावेळी सांगितलं.अभिनेता म्हणाला की," आमच्या घरात माणुसकीला सर्वात जास्त महत्त्व आहे.माझ्या घरात असलेले कर्मचारी वेगवेगळ्या संस्कृती आणि पार्श्वभूमीतून आलेले आहेत.त्यांच्या राहण्यापासून ते खाण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींची आमच्या येथे काळजी घेतली जाते.ठ
त्यानंतर जायेद खान म्हणाला,"धर्म हा आमच्यासाठी एक वैयक्तिक विषय आहे. तुम्ही त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहता हे देखील महत्त्वाचं आहे. कोणता धर्म चांगला, कोणता वाईट यावर वाद घालणं ही फार चुकीची गोष्ट आहे. आम्ही स्वत:ला एक धर्मनिरपेक्ष कुटुंब मानतो."
आईच्या शेवटच्या इच्छेबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला,"एकदा आम्ही नदीकिनारी बसलो होतो. त्यावेळी ती अगदी सहज बोलून गेली. माझ्या मृत्यूनंतर माझ्या अस्थी या नदीत विसर्जित कराव्यात. कारण,मला मुक्त व्हायचं आहे. शेवटी आईची ती इच्छा आम्ही पूर्ण केली. यावर इतर लोक काय म्हणतात याने आम्हाला काहीच फरक पडत नाही." असं अभिनेत्याने सांगितलं.
Web Summary : Zayed Khan explained his mother Zareen Khan's Hindu funeral honored her wish to be free after death. The family prioritizes humanity and secularism, disregarding criticism.
Web Summary : जावेद खान ने बताया, माँ जरीन खान का हिंदू अंतिम संस्कार उनकी मृत्यु के बाद मुक्त होने की इच्छा का सम्मान था। परिवार मानवता और धर्मनिरपेक्षता को प्राथमिकता देता है, आलोचना की परवाह नहीं करता।