Vivek Oberoi:बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे विवेक ओबेरॉय. विवेक ऑबेरॉयने २००२ साली इंडस्ट्रीत पदार्पण केलं. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र,अभिनेत्याला त्याच्या या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढउतारांचा सामना करावा लागला होता. या सगळ्या परिस्थितीत त्यांचं कुटुंब अभिनेत्याच्या पाठीशी ठामपणे उभं होतं. त्याच्या आईने आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात त्याची साथ दिली. शिवाय अलिकडेच विवेक ओबेरॉयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अलिकडेच विवेक ओबरॉयने 'UAE चा मातृदिन' (Mother's Day) साजरा केला. या निमित्ताने त्याने आपल्या आईसोबतचे सुंदर फोटो शेअर करत एक हृदयस्पर्शी आठवण शेअर केली आहे. एक वेळ अशी होती जेव्हा विवेक ओबेरॉय पूर्णपणे खचला होता. त्यावेळी त्या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी त्याला आईने मोठा आधार दिला होता.मातृदिनाच्या निमित्ताने विवेकने आईवरचं प्रेम व्यक्त करत पोस्टमध्ये लिहिलंय, मला आजही तो काळ आठवतो, जेव्हा मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण परिस्थितीतून जात होतो. माझ्या सभोवतालच्या भिंती जणू माझ्यावर कोसळत आहेत असं मला वाटत होते.मी बाहेरील जगासमोर शूर आणि कणखर असल्याचं दाखवत होतो, पण आतून मी पूर्णपणे खचलो होतो.
अभिनेता विवेक ओबेरॉयने पुढे म्हटलंय, त्याक्षणी मी तेच केलं जे मी नेहमी करतो. मी माझ्या आईकडे गेलो. मी जमिनीवर बसलो, लहान मुलासारखं माझं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं आणि नुसता रडलो. जेव्हा आयुष्य निरर्थक वाटू लागतं, तेव्हा आपण सगळेच विचारतो तो प्रश्न मी तिला विचारला: 'आई, हे माझ्यासोबतच का घडत आहे?या सर्व गोष्टी माझ्याच नशीबात का?'
मग अभिनेत्याने यापुढे म्हटलंय, तिने मला कोणतंही निरर्थक उत्तर दिलं नाही.फक्त प्रेमाने माझ्या केसांवरून हात फिरवला आणि विचारलं, "बाळा, जेव्हा तू इतके पुरस्कार जिंकत होतास, तेव्हा'माझ्यासोबतच का?' असं का नाही विचारलंस? जेव्हा लाखो लोक तुझं नाव घेत होते, तेव्हा तू तो प्रश्न का नाही विचारलास? दरम्यान, यावेळी विवेकच्या आईने त्याच्या आयुष्यातील चांगल्या दिवसांचाही दाखला दिला. त्यांच्या या सकारात्मक सल्ल्याने अभिनेत्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पुढे पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय, "हीच तर आईची जादू आहे. ती एकमेव व्यक्ती आहे जी तुमच्यातील कमकुवतपणाला ओळखू शकते आणि त्याचा उपयोग तुम्ही कसा केला पाहिजे. याची जाणीव करुन देते. ज्याप्रमाणे त्याच्या आईने प्रत्येक वाईट काळात त्याची काळजी घेतली, त्याचप्रमाणे त्याची पत्नीसुद्धा मुलांची चांगली काळजी घेत आहे. हे पाहून त्याला त्याच्या बालपणीच्या दिवसांची कायम आठवण येते, असंही विवेकने पोस्टमध्ये आवर्जून सांगितलं आहे.
Web Summary : Vivek Oberoi shared a heartfelt story of overcoming a difficult phase with his mother's support. He recalled breaking down, and his mother's wise words about appreciating good times shifted his perspective, reminding him of her constant support.
Web Summary : विवेक ओबेरॉय ने अपनी माँ के समर्थन से एक कठिन दौर से उबरने की कहानी साझा की। उन्होंने बताया कि कैसे वह टूट गए थे, और उनकी माँ के अच्छे समय की सराहना करने के बारे में बुद्धिमानी भरे शब्दों ने उनका नज़रिया बदल दिया।