Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्न न करताच तुषार कपूर झाला वडील,'त्या' निर्णयाची आई-वडिलांना नव्हती दिलेली पूर्वकल्पना, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:24 IST

"मला लग्न करणं ...", 'या' कारणामुळे तुषार कपूरने निवडला सरोगसीचा पर्याय, काय होती आई-वडिलांची प्रतिक्रिया?

Tusshar Kapoor: 'गोलमाल' फ्रँचायझीपासून 'गुड बॉय बॅड बॉय', 'ढोल', 'क्या कूल हैं हम'पर्यंतच्या चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता तुषार कपूर हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. वयाच्या पन्नाशीतही हा अभिनेता अद्याप सिंगल आहे. मात्र, लग्न न करताच तुषार कपूर बाबा बनला हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.तुषारचं लग्न झालेलं नसलं तरी तो एका मुलाचा बाप बनला आहे. आयव्हीएफ टेक्नॉलॉजी आणि सरोगसीच्या साहाय्याने तो एका मुलाचा बाबाबनला आहे. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्याच्या मुलाचा जन्म झाला.लक्ष्य असं तुषारच्या मुलाचं नाव आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने एकल पालकत्वावर भाष्य केलं आहे. 

'मेरी सहेली 'ला दिलेल्या मुलाखतीत तुषारने एकल पालकत्व त्याला आव्हानात्मक वाटत नाही, असं स्पष्ट केलं. या सगळ्याचं श्रेय त्याने वडील जितेंद्र यांना दिलंय. याबद्दल बोलताना तुषार मुलाखतीत म्हणाली,"मी जुन्या पीढीतला आहे. मी अगदीच माझ्या वडिलांसारखा आहे.पण, आमचे विचार वेगवेगळे आहेत. यूएसमध्ये पाच वर्ष राहिल्यानंतर मी स्वतंत्रपणे राहायला शिकलो. मी लग्न केलं नाही.माझा एक मुलगा आहे. मात्र, माझे बाबा असे नाही. त्यांचा लग्न आणि कुटुंबसंस्थेवर विश्वास आहे."

त्यानंतर तुषार एकल पालकत्वावर म्हणाला,"एका मुलाचा सांभाळ करणं तितकसं आव्हानात्मक नाही. तसंच मी लोकांमध्ये फारसा मिसळणारा व्यक्ती नाही. त्यामुळे मला जास्त फिरायला देखील आवडत नाही. मी ४० व्या वर्षी बाबा झालो. तोच काळ पालकत्व अनुभवण्यासाठी उत्तम होता. आपल्याकडे वयाच्या पंचवीशीतच लग्न आणि त्यानंतर मुलांबद्दल दबाव टाकला जातो. "

लग्न संस्थेबद्दल तुषार कपूर काय म्हणाला?

"लग्नसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, तरीही मला लग्न करायचं नव्हतं. मला वडील होण्याची इच्छा होती. मला ते जाणवलं, हे दैवी योगायोग झाल्यासारखं घडलं. अचानक माझी एका व्यक्तीसोबत भेट झाली. त्यानंतर  मला याबद्दल माहिती मिळाली आणि डॉक्टरांना भेटल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या. माझा देवावर विश्वास आहे आणि त्यामुळेच हे सगळं जुळून आलं."

तुषार कपूरने त्याच्या या निर्णयाबद्दल कुटुंबातील कोणालाही कल्पना दिली नव्हती. त्याबद्दल सांगताना तो म्हणाला,"माझ्यावर कुटुंबियांचा कोणताही दबाव नव्हता. कारण, मी त्यांच्याशी याबद्दल कोणतीही चर्चा केली नव्हती. तेव्हा माझं वय साधारण ३९ वर्ष इतकं असेल. त्यावेळी मी तिरुपतीला जाताना फ्लाईटमध्ये प्रकाश झा यांच्यासोबत माझी भेट झाली.आम्ही मित्र नव्हतो पण एकमेकांना चांगले ओळखत होतो.त्यादरम्यान,आमची प्लॉईट कॅन्सल झाली आणि मग येताना आम्ही एकाच गाडीतून प्रवास केला. तेव्हा ते मला म्हणाले, तू जर लग्न करणार नसशील तर मग एकल पालकत्वाचा विचार का करत नाहीस. त्यानंतर मग मी यावर विचार करायला सुरुवात केली. मी डॉक्टरांशी संपर्क केला. त्यांनी मला याबद्दल सगळं काही समजावून सांगितलं.  त्यानंतर मी हा निर्णय घेतला आणि वडील झालो."

English
हिंदी सारांश
Web Title : Tusshar Kapoor Became Father Without Marriage, Parents Unaware of Decision

Web Summary : Tusshar Kapoor became a father via IVF and surrogacy, naming his son Laksshya. He embraced single parenthood, influenced by his independent spirit. He values marriage but chose fatherhood unconventionally, initially surprising his family. Prakash Jha's suggestion inspired him.
टॅग्स :जितेंद्रबॉलिवूडएकता कपूरसेलिब्रिटी