बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टायगर श्रॉफनेदुबईत नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. टायगरने दुबईमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. टायगरने दुबईच्या ब्रीय बाय डेन्यूब प्रोजेक्टमध्ये वॉटरफ्रंट प्रॉपर्टी खरेदी केली आहे. दुबईच्या मैरीटाइम सिटीमध्ये हा टॉवर आहे ज्यामध्ये टायगरने फ्लॅट खरेदी केला आहे. जो पूर्णपणे इंटेरियर डिझाइन केलेला असून ४० पेक्षा जास्त सुविधा दिल्या जातात. दुबईतल्या लँडमार्क्सजवळ ही प्रॉपर्टी असल्याने त्याची किंमत जास्त आहे.
या प्रॉपर्टीबद्दल टायगर म्हणाला, "दुबई नेहमीच लाइफस्टाइल आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ओळखलं जातं. त्यामुळेच मी प्रभावित झालो. दुबईत प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत होतो. मला ब्रीज बाय डेन्यूब सगळ्यात चांगलं वाटलं. या प्रॉपर्टीची किंमत वाढतच जाते. म्हणूनच मला दुबईत फ्लॅट खरेदी करायचा होता. मी दुबईला आता माझं दुसरं घर म्हणू शकतो".
टायगर श्रॉफ हा लोकप्रिय अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. २०१२ साली त्याने हिरोपंती सिनेमातून पदार्पण केलं होतं. बाघी, स्टुडंट ऑफ द इयर, वॉर, बडे मिया छोटे मिया, गणपत या सिनेमात तो दिसला.
Web Summary : अभिनेता टायगर श्रॉफने दुबईमध्ये डेन्यूब प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आहे. दुबईची जीवनशैली आणि पायाभूत सुविधांमुळे प्रभावित होऊन त्याने ही प्रॉपर्टी खरेदी केली. या प्रॉपर्टीला त्याने आपले दुसरे घर म्हटले आहे. प्रॉपर्टीची वाढती किंमत आणि सुविधा हे त्याचे मुख्य आकर्षण आहे.
Web Summary : बॉलीवुड अभिनेता टाइगर श्रॉफ ने दुबई के डेन्यूब प्रोजेक्ट में एक वाटरफ्रंट संपत्ति में निवेश किया है। उन्होंने दुबई की जीवनशैली और बुनियादी ढांचे को अपनी खरीद का कारण बताया और संपत्ति को अपना दूसरा घर बताया। वह संपत्ति के बढ़ते मूल्य और सुविधाओं से प्रभावित हुए।