Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रदर्शनापूर्वीच सनी देओलच्या 'बॉर्डर-२' मध्ये मोठा बदल, निर्मात्यांनी घेतला 'हा' निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:46 IST

प्रदर्शनापूर्वीच सनी देओलच्या 'बॉर्डर-२' मध्ये मोठा बदल, जाणून घ्या याबद्दल

Sunny Deol Border 2 Movie:बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि त्याचे कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. वडील धर्मेंद्र यांच्या निधन झालं असून देओल कुटुंबाने त्यांचा मोठा आधार गमवला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण बॉलिवूड शोकमग्न आहे. परंतु, सनी देओलाचा बॉर्डर-२ हा बिग बजेट चित्रपट पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांना आशा आहे की तो लवकरच काम सुरू करेल. याच दरम्यान, एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

बॉर्डर २ बद्दल बऱ्याच काळापासून बरीच चर्चा आहे, पण आता शेवटच्या क्षणी या चित्रपटाबाबत एक मोठा बदल करण्यात आला आहे.बॉर्डर २ चित्रपटात सनी देओलसह, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी आणि वरुण धवन हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.येत्या २०२६ मध्ये प्रजासत्ताक दिनापूर्वी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. दरम्यान, 'बॉर्डर २' चे निर्माते सध्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटातील सर्वात मोठं म्युझिकल कोलॅबरेशन जगभरात रिलीज करण्याच्या तयारीत आहेत.माहितीनुसार,'संदेसे येते हैं' या देशभक्तीपर गाण्याचं रिक्रेएटेड व्हर्जन तयार करण्यात येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच बॉर्डर- २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. तसंच 'संदेसे येते हैं' या देशभक्तीपर गाण्याचं रिक्रेएटेड व्हर्जन बनवण्यासाठी काम करण्यात येत आहे. या गाण्यासाठी सोनू निगम आणि अरिजीत सिंग यांचा आवाज देण्यात आला आहे. आता असं म्हटलं जातंय की या कोलॅबरेशनमध्ये दिलजीत दोसांझचीही एन्ट्री झाली आहे.सोनू निगम, अरिजीत सिंग यांच्याबरोबर दिलजीतही आपली सुरांची जादू दाखवणार आहे.

अभिनयाबरोबर दिलजीत सिनेमासाठी गाणं देखील गाणार आहे. बॉर्डर २ मध्ये, तो भारतीय हवाई दलाचे अधिकारी निर्मलजीत सिंग सेखोन यांची भूमिका साकारतो, ज्यांना भारत-पाकिस्तान युद्धात त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Border 2: Major changes before release; producers make key decision.

Web Summary : Sunny Deol's Border 2 undergoes changes. A recreated version of 'Sandese Aate Hain' is planned with Sonu Nigam, Arijit Singh, and Diljit Dosanjh. The film is expected to release before Republic Day 2026.
टॅग्स :सनी देओलबॉलिवूडसेलिब्रिटी