बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी बुधवारी दुपारी पवित्र नगरी उज्जैनमध्ये दाखल झाला. १२ ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचे स्थान असलेल्या जगप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिरात जाऊन त्याने बाबा महाकालचे दर्शन घेतले. आगामी 'बॉर्डर २' या चित्रपटाच्या यशासाठी आणि मुलाच्या उज्वल भविष्यासाठी त्याने यावेळी प्रार्थना केली.
सुनील शेट्टीने जलद्वारातून मंदिरात प्रवेश केला. पंडित आणि पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने भगवान महाकालची विधीवत पूजा-अर्चा आणि अभिषेक केला. पूजा आटोपल्यानंतर त्याने नंदी मंडपात सुमारे दहा मिनिटे डोळे मिटून शांतपणे ध्यानधारणा केली. यावेळी मंदिर परिसरात अत्यंत भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.
महाकाल दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील शेट्टी भावुक झाला. तो म्हणाला, "नवीन वर्षात सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच प्रार्थना घेऊन मी बाबांच्या दरबारात आलो आहे. माझ्या आईपासून ते मुलांपर्यंत आणि नातीपासून ते मित्रांपर्यंत, सर्वांवर बाबांची कृपा राहावी, असं साकडं मी घातलं आहे. महाकालची कृपा जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येते".
सुनील शेट्टीने आपल्या आगामी प्रकल्पांबद्दलही भाष्य केले. तो म्हणाला, "बॉर्डर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट देशाच्या शहीद सैनिकांच्या बलिदानावर आधारित आहे. विशेष म्हणजे, माझा मुलगा अहान शेट्टी या चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट यशस्वी व्हावा आणि प्रेक्षकांना तो आवडावा, यासाठी मी महाकालचे विशेष आशीर्वाद मागितले आहेत".
चाहत्यांची गर्दी आणि मंदिर समितीकडून सन्मानमंदिरात सुनील शेट्टीला पाहताच चाहत्यांनी सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दर्शनानंतर श्री महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने उपप्रशासक एस. एन. सोनी आणि सिम्मी यादव यांनी सुनील शेट्टीचा सन्मान केला.
Web Summary : Suniel Shetty visited Ujjain's Mahakal temple, praying for 'Border 2's success and his son Ahan's future. He performed rituals, meditated, and expressed hope for health and prosperity. He sought blessings for his family and the film's success, which honors martyred soldiers.
Web Summary : सुनील शेट्टी ने उज्जैन के महाकाल मंदिर में 'बॉर्डर 2' की सफलता और बेटे अहान के भविष्य के लिए प्रार्थना की। उन्होंने अनुष्ठान किए, ध्यान लगाया और स्वास्थ्य व समृद्धि की कामना की। उन्होंने अपने परिवार और फिल्म की सफलता के लिए आशीर्वाद मांगा, जो शहीद सैनिकों को समर्पित है।