Join us
Daily Top 2Weekly Top 5

रातोरात स्टारडम मिळालं पण एक चूक भोवली; अभिनेत्याच्या करिअरला लागली उतरती कळा, आता परदेशात विकतोय कपडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:19 IST

सुपरहिट पदार्पण पण त्या घटनेमुळे करिअर झालं बर्बाद; अभिनेता आता चित्रपटसृष्टीपासून दूर राहून जगतोय 'असं' आयुष्य 

Bollywood Actor Shiney Ahuja: अभिनयाच्या झगमगत्या विश्वात स्वत:चं स्थान निर्माण करायला काहींना वेळ लागतो. तर काही जण अगदी अल्पावधीतच लोकप्रिय होतात. मात्र, ही लोकप्रियता टिकवून  ठेवणं तितकंच कठीण असतं. बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्यानं पदार्पणातच उत्तम कामगिरी दाखवली. त्यानंतर त्याने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. परंतु, यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याच्या करिअरला मोठा धक्का बसला. आज हा अभिनेता सिनेसृष्टीपासून दूर आहे.

दरम्यान,या अभिनेत्याचं नाव शायनी अहुजा आहे.प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अभिनेत्याच्या एका चुकीमुळे त्याचं संपूर्ण करिअर  क्षणार्धात उद्ध्वस्त झालं. शायनी अहूजाने  'हजारो ख्वाहिंशे ऐसी' या चित्रपटातून त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं.  त्यानंतर  'गँगस्टर' (२००६), 'लम्हे' (२००६), 'लाइफ इन अ मेट्रो' (२००७) आणि 'भूल भुलैया' (२००७) यांसारख्या चित्रपटांमधून अभिनेता शायनी अहुजा चांगलाच प्रसिद्धीझोतात आला.आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या या अभिनेत्याला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअरचं नामांकनही मिळालं होतं. 

'ती' एक घटना अन् अभिनेत्याचं करिअर संपुष्टात आलं...

२००९ मध्ये शायनीला त्याच्या घरातील १९ वर्षीय मोलकरणीवर बलात्कार करण्याच्या आणि तिला धमकावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.या प्रकरणामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली.या घटनेनंतर शायनीचं फिल्मी करिअर संपुष्टात आलं.अभिनेत्याच्या करिअरला उतरती कळा लागली. २००९ ते २०१५ पर्यंत तो फक्त तीन चित्रपटांमध्ये दिसला. यानंतर २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्या अभिनेत्याला जामिनावर सोडलं. पण,या घटनेमुळे त्याच्यासोबत कोणीही काम करायाला तयार नव्हतं.या प्रकरणी त्याला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

अभिनेता कुठे झाला गायब?

शायनी आहुजा शेवटचा 'वेलकम बॅक' या चित्रपटात दिसला होता. पण, या चित्रपटानंतर तो कुठेच दिसला नाही. शायनी आहुजाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याने १९९७ मध्ये मॉडेस अनुपम पांडे सोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी देखील आहे. शायनी सिनेविश्वापासून दूर आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शायनी आहुजा सध्या फिलीपिन्समध्ये वास्तव्यास आहे. तिथे तो कपड्यांचा व्यवसाय करतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Overnight Stardom to Clothing Sales: Actor's Downfall After One Mistake

Web Summary : Shiney Ahuja, after early Bollywood success, faced downfall following allegations in 2009. Career halted, he briefly appeared in films, then moved abroad. Now, Ahuja resides in the Philippines, running a clothing business after a controversial past.
टॅग्स :शायनी अहुजाबॉलिवूडसेलिब्रिटी