Shakti Kapoor: हिंदी सिनेसृष्टीत हिरो होण्याचं स्वप्न उराशी बाळगून लाखों तरुण-तरुणी मुंबई गाठतात.मात्र,त्यातील काही मोजकेच यशस्वी होतात. असाच एक अभिनेता ज्याने दिल्लीतील करोलबाग येथून अभिनेत्याचं बनण्यांचं स्वप्न घेऊन मुंबईत आला. पण, नायक नाहीतर, पडद्यावर खलनायक साकारून त्याने प्रसिद्धी मिळवली. हे नाव म्हणजे शक्ती कपूर.८०-९० च्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे शक्ती कपूर.अनेक वर्षांपासून विनोदी व खलनायकाच्या भूमिका करीत ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सध्या ते एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत.
शक्ती कपूर यांनी साकारलेल्या खलनायिका भूमिका विशेष गाजल्या. परंतु, त्यांच्या पालकांना ते मान्य नव्हतं. एकदा चित्रपटातील शक्ती कपूर यांचं काम पाहून त्यांचे आई-वडीच चक्क थिएटर उठून गेले होते. नुकतीच त्यांनी अल्फा नियॉन स्टूडियोज ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी एका चित्रपटाचा किस्सा शेअर केला ते म्हणाले, "त्यावेळी माझे दोन चित्रपट रिलीज झाले होते.त्यातीलच एका मोठा सिनेमा म्हणजे इन्सानियत के दुश्मन हा होता. तेव्हा मी माझ्या आईृ-वडिलांना तो चित्रपट पाहायला सांगितलं. त्यानंतर ते दोघेही गेले. पण, चित्रपटातील माझ्या पहिल्याच सीनमध्ये मी एका मुलीची ओढणी ओढली, असा तो सीन होता. "
त्यानंतर शक्ती कपूर म्हणाले," तो सीन पाहिल्यानंतर माझे आई-वडील दोघेही बाहेर निघून गेले. तेव्हा बाबा रागात म्हणाले, हा आधी बाहेर असं वागायचा आता चित्रपटातही असंच काम करतोय.मला हा चित्रपट बघायचा नाही. त्यानंतर त्यांनी मला खूप सुनावलं. तू अशा प्रकारच्या भूमिका का करतो आहेस, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की मी चांगल्या भूमिका कराव्यात आणि हेमा मालिनी व झीनत अमान यांच्यासारख्या अभिनेत्रीसोंबत काम करावं." असा किस्सा शक्ती कपूर यांनी मुलाखतीत सांगितला.
त्यानंतर शक्ती कपूर यांनी त्यांच्या वडिलांना प्रतिक्रिया देत म्हणाले,"मला तुम्ही जन्म दिला आहे. तसेच चेहरा दिला आहे. या चेहऱ्याकडे पाहून मला कुणीही चांगल्या माणसाची किंवा नायकाची भूमिका देणार नाही", असं शक्ती कपूर म्हणाले होते.
Web Summary : Shakti Kapoor shared an incident where his parents walked out of his movie after seeing him misbehave with a woman. His father was angry and advised him to do good roles.
Web Summary : शक्ति कपूर ने एक घटना साझा की जहाँ उनके माता-पिता एक महिला के साथ दुर्व्यवहार करते हुए देखने के बाद उनकी फिल्म से बाहर चले गए। उनके पिता नाराज़ थे और उन्हें अच्छी भूमिकाएँ करने की सलाह दी।