Shakti Kapoor: सध्याच्या काळात सोशल मिडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य बनला आहे. अगदी गावपातळीपर्यंत सोशल मिडियाचा वापर सर्हास होऊ लागला आहे. या सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील जाणवतात. या माध्यमावर एखादी वाईट गोष्ट किंवा चुकीची बातम्या अगदी वाऱ्यासारख्या परसतात. यामुळे नकळतपणे काही जणांकडून या बातम्यांवर विश्वास ठेवला जातो. बऱ्याचदा सर्वसामान्यांसह कलाकारमंडळींना देखील याचा सामना करावा लागतो. अनेकजण सोशल मीडियाचा वापर करत कलाकारांबद्दल अफवा पसरवतात. अशातच अभिनेते शक्ती कपूर यांना देखील असाच काहीसा अनुभव आला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवल्यामुळे ते अत्यंत अस्वस्थ झाले आहेत.
दरम्यान, शक्ती कपूर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या आरोग्याबाबत अपडेट दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या निधनाच्या बातम्या पसरत होत्या, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. आता, खुद्द अभिनेत्याने पुढे येऊन या सगळ्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओद्वारे त्यांनी आपण जिवंत आणि सुखरूप असल्याचं स्पष्ट केलं; तसंच, अशा खोट्या आणि चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.तसंच या व्हिडीओमधून त्यांनी याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.
या व्हिडीओमध्ये शक्ती कपूर यांनी म्हटलंय, "सर्वांना नमस्कार. माझ्या मृत्यूची बातमी पूर्णपणे खोटी आहे. मी पूर्णपणे ठीक आणि आनंदी आहे. कृपया त्याकडे दुर्लक्ष करा. या संदर्भात तक्रार दाखल करण्याचा माझा विचार चालू आहे. हे योग्य नाही. हे चांगले नाही."
कायदेशीर कारवाईचा दिला इशारा...
शक्ती कपूर यांनी या व्हिडीओमध्ये असंही सांगितलंय की, आपल्या मृ्त्यूबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर ते कायेदशीर कारवाई करतील. अशा पद्धतीच्या बातम्या कोणाच्याही कुटुंबीयांसाठी आणि इतर जवळच्या व्यक्तींसाठीही त्रासदायक ठरू शकतात, असं सुद्धा ते यावेळी म्हणाले.
Web Summary : Shakti Kapoor refuted rumors of his death circulating online. He confirmed he is alive and well, expressing anger and considering legal action against those spreading false news, which he said is distressing for families.
Web Summary : शक्ति कपूर ने अपनी मौत की ऑनलाइन अफवाहों का खंडन किया। उन्होंने पुष्टि की कि वह जीवित और स्वस्थ हैं, गुस्सा व्यक्त किया और झूठी खबरें फैलाने वालों के खिलाफ कानूनी कार्रवाई करने पर विचार कर रहे हैं, जो उन्होंने कहा कि परिवारों के लिए कष्टदायक है।