Join us
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार शाहिद कपूर! पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 10:02 IST

'या' अभिनेत्रीसोबत शाहिद कपूरची पहिल्यांदाच जमणार जोडी! नव्या सिनेमाबद्दल समोर आली मोठी अपडेट, प्रेक्षक उत्सुक

Shahid Kapoor Upcoming Film: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहिद कपूर त्याच्या अभिनयासह चित्रपटांमुळे देखील चर्चेत असतो. सध्या तो  'कॉकटेल २' या चित्रपटामुळे  प्रसिद्धीझोतात आला आहे. एकीकडे या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असताना शाहिदीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल मोठी अपडेट हाती आली आहे.लवकरच शाहिद कपूर दिग्दर्शक अमित शर्मा यांच्या एका नवीन रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री भूमिकेत कोण दिसणार, याबद्दल आता एक नाव चर्चेत आलं आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर या रोमकॉम चित्रपटात शाहिद कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार,या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अमित शर्मा करणार आहेत.हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी असून, त्यात आधुनिक नातेसंबंधावर भाष्य करणारा आहे.या  प्रोजेक्टसंदर्भात जान्हवीसोबत चर्चा सुरु असल्याचंही बोललं जात आहे. विशेष म्हणजे,  जान्हवी आणि शाहिद या प्रोजेक्टच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील. दरम्यान, याबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सध्या शाहिद कपूर त्याच्या 'फर्जी २' या वेब सीरिजचे चित्रीकरणामध्ये व्यस्त आह. त्यामुळे २०२६ च्या शेवटी या सिनेमाच्या शूटिंगला तो सुरुवात करणार आहे.शिवाय निर्माते ऑक्टोबर २०२६ मध्ये चित्रीकरण सुरू करण्याची तयारी करत असून,प्री- प्रोडक्शनची कामे जोरात सुरू असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, सहाय्यक कलाकार आणि चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित व्हायचं असलं तरी, या प्रोजेक्टमुळे चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shahid Kapoor to romance younger actress Janhvi Kapoor in new film!

Web Summary : Shahid Kapoor may star with Janhvi Kapoor in a romantic comedy directed by Amit Sharma. This marks their first on-screen collaboration, exploring modern relationships. Filming is expected to begin in late 2026.
टॅग्स :शाहिद कपूरजान्हवी कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा