Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) हा इंडस्ट्रीतील सर्वात आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे चित्रपट हिट झालेले असो किंवा फ्लॉप परंतु सलमानचा स्टारडम कधीच कमी झाला नाही. दरम्यान, आपल्या ३६ वर्षांच्या करिअरमध्ये सलमान खानचं नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. सलमान त्याच्या अभिनयासह लव्ह लाईफमुळे चांगलाच चर्चेत राहिला आहे. त्यात अलिकडेच अभिनेत्याने एका टीव्ही शोमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे.
अलिकडेच 'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन ३ मध्ये सलमान खानने अनेक किस्से शेअर केले. त्यादरम्यान, त्याने त्याच्या लव्ह लाईफबद्दलही सांगितलं. त्यावेळी शोमध्ये, कपिल शर्माने फिरकी घेत म्हणाला, "गर्लफ्रेंडच्या बाबतीत सलमान भाग्यवान आहे". त्याच्या या बोलण्यावर उत्तर देत अभिनेता म्हणाला, "हे खरं नाही. मी ५९ वर्षांचा आहे, पण माझ्या फक्त ३-४ गर्लफ्रेंड्स राहिल्या आहेत. जर तुम्ही विचार केला तर, माझं रिलेशनशिप ७-८ वर्ष आणि जास्तीत जास्त १२ वर्षे टिकली आहेत. आजच्या मुला-मुलींच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. पण, आजकालची मुलं एका नात्यामधूनन दुसऱ्या नात्यात सहज गुंतून जातात, त्यांच्या तुलनेत मी जुन्या पीढीचा आहे. " असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
सलमान खानचं नाव संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कैटरीना कैफ आणि यूलिया वंतूर अशा अभिनेत्रींसोबत अनेकदा जोडण्यात आलं. सलमान आणि संगीता देखील लग्न करणार होते, पण काही कारणामुळे त्याचं नातं पुढे जाऊ शकलं नाही.