Join us

'बम बम भोले' नंतर 'सिकंदर' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान-रश्मिकाच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:07 IST

लवकरच 'सिकंदर' हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Salman Khan Sikandar Movie: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'सिकंदर' सिनेमाची हिंदी चित्रपटसृष्टीत जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ए. आर. मुरुगोदास यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. अलिकडेच होळीच्या निमित्ताने चित्रपटातील 'बम बम भोले',  हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. तसंच 'मेरी जोहरा जबी' हे गाणं सुद्धा सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आहे. त्यानंतर आता सिकंदर' मधील आणखी एक नवीन गाणं रिलीज करण्यात आलंय. 

'सिकंदर' चित्रपटातील 'सिकंदर नाचे' हे तिसरं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये सलमान आणि रश्मिकाचा धमाकेदार डान्स पाहायला मिळतो आहे. शिवाय त्यांच्या केमिस्ट्रीची देखील चर्चा होताना दिसते आहे. या गाण्याला अमित मिश्रा,अकासा  सिंगआणि सिद्धांत मिश्रा यांनी आवाज दिला आहे.

'सिकंदर' या ईदला म्हणजेच २८ मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान सिनेमात संजय राजकोट या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानासईश्रीची भूमिका साकारणार आहे तर अभिनेते सत्यराज मिनिस्टर प्रधानच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय सिनेमात शर्मन जोशी, प्रतीक बब्बर हे कलाकारही झळकणार आहे. ए. आर. मुरुगोदास यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय तर साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. २०२५ च्या ईदमध्ये म्हणजेच पुढील महिन्यात हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदाना