Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफचा 'नवाबी' थाट! मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपटी, तब्बल इतक्या कोटींना झाला व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:24 IST

सैफ अली खानने खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपटी, किती आहे किंमत?

Saif Ali Khan:बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या कामाबरोबरच लाईफस्टाईलमुळेही तितकेच चर्चेत येत असतात. महागड्या ब्रॅंडसचे कपडे, गाड्या तसंच आलिशान घरं यामुळे ते चाहत्यांमध्ये चर्चेत येतात.यापैकी इंडस्ट्रीतील चर्चेतील एक नाव म्हणजे अभिनेता सैफ अली खान.बॉलिवूड अभिनेता आणि पतौडी खानदानचा नवाब म्हणून ओळखला जाणारा सैफ सध्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना दिसतोय. नुकतीच त्याने मुंबईमध्ये ऑफिससाठी जागा खरेदी केली आहे.

कोट्यवधी संपत्तीचा मालक असलेला सैफ अली खान यांची मुंबईत मोठी प्रॉपर्टी आहे.नुकतीच मुंबईत करोंडोंचा व्यवहार करत प्रॉपर्टी खरेदी केली.सैफने मुंबईमध्ये त्याच्या नवीन ऑफिससाठी दोन नवीन जागा खरेदी केल्या आहेत. त्याची किंमत आता समोर आली आहे.अलिकडेच अभिनेत्याने मुंबईतील अंधेरी येथे ३०.४५ कोटी रुपयांच्या किंमतीचे दोन कमर्शिल ऑफिस खरेदी केले आहेत.हा परिसर मुंबईतील सर्वात पॉश एरियामध्ये गणला जातो. 

चित्रपट असो किंवा इतर गोष्टी सैफ नेहमीच त्याच्या निर्णयांसाठी ओळखला जातो आणि ही खरेदी त्याचं आणखी एक उदाहरण आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैफ अली खानचे हे लक्झरी अपार्टमेंट ‘कनकिया वॉलस्ट्रीट’  बिल्डिंगमध्ये आहे. या जागेचं एकूण क्षेत्रफळ ५,६८१ चौरस फूट असल्याचं सांगण्यात येतंय. शिवाय, या करारात सैफला सहा कार पार्किंग स्पॉट्स देखील मिळाले आहेत. रिपोर्टनुसार, ही मालमत्ता अमेरिकास्थित औषध कंपनी एपिओर फार्मास्युटिकलने विकली आहे. याआधीही सैफ अली खानने एक आलिशान परदेशी मालमत्ता खरेदी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Saif Ali Khan's Luxurious Purchase: Buys Property Worth Crores in Mumbai

Web Summary : Saif Ali Khan, known for his Nawab lifestyle, recently invested in real estate. He purchased two commercial office spaces in Mumbai's Andheri for ₹30.45 crore, spanning 5,681 sq ft with six parking spots, located in 'Kanakia Wallstreet'. The property was sold by Aprior Pharmaceutical.
टॅग्स :सैफ अली खान बॉलिवूडसेलिब्रिटी