Ranveer Singh:बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या धुरंधर सिनेमाचं यश अनुभवतो आहे. ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेला हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. प्रेक्षकांमध्येही या सिनेमाची कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे. 'धुरंधर' च्या जबरदस्त यशानंतर आता रणवीर एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०२६ मध्ये तो अशाच धमाकेदार चित्रपटांतून कहर करताना दिसणार आहे. या त्याच्या आगामी चित्रपटात रणवीर सिंग पुन्हा एकदा दमदार भूमिकेत झळकरणार असल्याचं समोर आलं आहे.
'धुरंधर' नंतर रणवीर सिंग लवकरच चित्रपट ‘प्रलय’ या आगामी थ्रिलर मध्ये दिसणार आहे. काही वृत्तांनुसार, रणवीरला ‘प्रलय’ चित्रपटासाठी अधिकृतपणे साइन करण्यात आलं आहे. तो या चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती मिळते आहे. तर दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री लोका-चॅप्टर चंद्र फेम कल्याणी प्रियदर्शन त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमातून कल्याणी प्रियदर्शन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,'प्रलय' हा एक बिग बजेट चित्रपट आहे.यात अप्रतिम व्हिज्युअल इफेक्ट्स यावर विशेष भर देण्यात आला आहे.चित्रपट निर्माते एप्रिल २०२६ मध्ये 'प्रलय' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Web Summary : After 'Dhurandhar' success, Ranveer Singh stars in thriller 'Pralay' with Kalyani Priyadarshan, marking her Bollywood debut. Filming begins April 2026.
Web Summary : 'धुरंधर' की सफलता के बाद, रणवीर सिंह 'प्रलय' में कल्याणी प्रियदर्शन के साथ नजर आएंगे, जो बॉलीवुड में डेब्यू कर रही हैं। शूटिंग अप्रैल 2026 में शुरू होगी।