Rajat Bedi: हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी सृष्टी आहे. इथे ज्याची चलती असते त्याचाच निभाव लागतो.असाच एक अभिनेता ज्याने करिअरमध्ये सुरळित सगळं काही सुरळित सुरु असताना अभिनयातून ब्रेक घेत तो कॅनडामध्ये स्थायिक झाला.या अभिनेत्याचं नाव रजत बेदी. सध्या या अभिनेत्याने आर्यन खानच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड' मधून इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे. त्याच आता अलिकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये रजत बेदीने त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल आणि कटू अनुभवांवर भाष्य केलं आहे.
बऱ्याच वर्षांनंतर इंडस्ट्रीत पुनरागमन करणारा रजत बेदी 'कोई मिल गया' चित्रपटातून चांगलाच प्रसिद्धीझोतात आला होता. या चित्रपटात राज हे खलनायिकी पात्र त्याने साकारलं होतं. या चित्रपटानंतर रजत सिनेसृष्टीत फारसा सक्रिय दिसला नाही. यावर आता अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा तो म्हणाला,"माझा लोकांनी वापर केला आणि मला बाजूला केलं. मी लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि त्याचं नुकसान मलाच भोगावं लागलं. कॅनाडामध्ये राहत असताना मला असाच एक अनुभव रिअल इस्टेट बिझनेस आणि अभिनय करताना एकाने मला फसवलं. त्यांच्यामुळे मी परत आलो. याचदरम्यान रजतने त्याचे आणि शाहरुखच्या मैत्रीचे किस्सेही शेअर केले.
रजत बेदीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने 'कोई मिल गया' चित्रपटाव्यतिरिक्त रजतने ' चालबाज','जानी दुश्मन:अनोखी प्रेम कहाणी' तसेच 'रॉकी' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.