Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या जावयाचा नादच खुळा! दुबईच्या रस्त्यावर पळवली २५ लाखांची BMW बाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:50 IST

कोल्हापूरचा जावई असलेल्या अभिनेत्यानं दुबईच्या रस्त्यावर २५ लाख रुपयांची आलिशान बीएमडब्ल्यू बाईक पळवली आहे. 

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता आर. माधवन सध्या त्याच्या एका वेगळ्याच अंदाजामुळे चर्चेत आला आहे. कोल्हापूरचा जावई असलेल्या माधवनने चक्क दुबईच्या रस्त्यावर २५ लाख रुपयांची आलिशान बीएमडब्ल्यू बाईक पळवली आहे. 

माधवन हा सध्या पत्नी सरिता बिर्जे हिच्यासोबत दुबईत सुट्ट्यांचा आनंद लुटतोय. यावेळी त्याने 'BMW R1300 GS Adventure' ही हाय-एंड बाईक चालवण्याचा आनंद घेतला. या बाईकची किंमत तब्बल २५ लाख ७४ हजार ८९६ रुपये इतकी आहे. काळ्या रंगाचं रायडिंग जॅकेट आणि डॅशिंग सनग्लासेसमध्ये माधवनचा जबरदस्त लूक पाहायला मिळाला. माधवनला गाड्या आणि बाईक्सची प्रचंड आवड आहे.

आर. माधवनची पत्नी सरिता बिर्जे या कोल्हापूरच्या आहेत. कोल्हापूरमध्ये पब्लिक स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच म्हणून काम करत असतांनाच त्याची ओळख सरिता बिर्जे हिच्यासोबत झाली. सरिताला एअर होस्टेस व्हायचं होतं. विशेष म्हणजे तिने एअर होस्टेसची परिक्षाही पास केली. त्यामुळे माधवनचे आभार मानण्यासाठी तिने त्याला घरी जेवायला बोलावलं. त्यानंतर त्यांच्यातली मैत्री वाढली आणि या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 

'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळमाधवनच्या या आनंदाचं आणखी एक मोठं कारण म्हणजे त्याचा अलीकडेच प्रदर्शित झालेला 'धुरंधर' हा चित्रपट. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटात माधवनने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या या ऐतिहासिक यशानंतर माधवन आता दुबईत 'क्वालिटी टाइम' घालवत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Son-in-Law R. Madhavan's Swag: Drives ₹25 Lakh BMW in Dubai!

Web Summary : R. Madhavan, Kolhapur's son-in-law, enjoys Dubai vacation with his wife, riding a ₹25 lakh BMW bike. He is celebrating the success of his film 'Dhurandhar'.
टॅग्स :आर.माधवनदुबईबॉलिवूड