Join us

"मी समलैंगिक नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचं 'त्या' अफवांवर भाष्य; पत्नीपासून वेगळं होण्याचं कारणही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:07 IST

"समलैंगिक असण्यात...", प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य, पत्नीपासून वेगळं होण्याचं कारणही सांगितलं 

Deepak Parashar: ८० च्या दशकातील आघाडीच्या  अभिनेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे दीपर प्राशर. आपला अभिनय आणि गुडलूक्समुळे या अभिनेत्याने इंडस्ट्रीतील भल्याभल्या नायकांना टक्कर द्यायचा. पुरानी हवेली, शैतानी लाका यांसाखे हिट सिनेमे देऊन हा अभिनेता इंडस्ट्रीतून अचानक गायब झाला. एका अपघातामुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांबरोबर काम करणाऱ्या या नायकाने वैयक्तिक आयुष्यासह करिअरमध्येही चढ-उतार पाहिले. त्यात आता  एका मुलाखतीत ते आपल्या फिल्मी जर्नीबद्दल भरभरुन बोलले आहेत.

दीपर प्राशर यांनी मॉडेलिंगपासून करिअरला सुरुवात करुन इंडस्ट्रीत स्वतची वेगळी ओळख निर्माण केली होती.बड्या नायिकांसोबत काम करुनही त्यांना बी ग्रेड सिनेमांमध्ये काम करावं लागलं. नुकतीच त्यांनी विक्की लालवाणी यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, ते म्हणाले, मिस्टर रामसे यांना बरीच मुलं होती आणि ते सर्व चित्रपट बनवत होते. मी एका मुलाचा चित्रपट केला आणि त्यानंतर मग मला सहा चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. मी इमोशनल असल्यामुळे त्यांना नाही म्हणू शकलो नाही. ए ग्रेड चित्रपट नाहीत हे माहीत असूनदेखील मी त्या चित्रपटांमध्ये काम केलं.भावनिकदृष्ट्या विचार केल्यामुले मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही.मात्र, त्यानंतर त्याच पद्धतीच्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या. 

अपघातात पायाला ३८० टाके पडले

त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं, "पण, त्यावेळी माझा अपघात झाला होता. या अपघातात माझा पाय कापला गेला होता आणि पायाला जवळपास ३८० टाके पडले होते. त्यावेळी माझी पत्नी ८ महिन्यांची प्रेग्नन्ट होती. मी दुबईहून भारतात परत आलो. त्यानंतर तिचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे मला जाणवलं. एक दिवस ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की, मी फक्त तुझ्या ग्लॅमरसाठी तुझ्याशी लग्न केलेलं.तिचं ते बोलणं ऐकून मला धक्काच बसला.शिवाय ती काही दिवसात परत येईल असं मला वाटत होतं. पण,प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही.ती पैसे, दागिने घेऊन निघून गेली.त्यामुळे मोठं आर्थिक संकट ओढावलं होतं. शिवाय तिने माझ्याबद्दल अफवाही पसरवल्या."

लैंगिकतेवर भाष्य करत दीपक म्हणाले...

बिग बॉसमध्ये दीपक यांनी लैंगिकतेवर वक्तव्य केलं होतं. त्याबद्दल त्यांना या मुलाखतीत विचारण्यात आलं. तो प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेते म्हणाले, "सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी कोणासमोरही माझी लैंगिकता जाहीर केलेली नाही, कारण मला त्याची गरज वाटत नाही. हेही तितकंच खरं आहे की, मी गे नाही. समलैंगिक असण्यात काहीही चूक नाही. या इंडस्ट्रीमध्ये असे बरेच लोक आहेत जे समलैंगिक आहेत. त्यांच्या करिअरला कलंक लागलेला नाही, त्यामुळे एका विधानामुळे माझ्या करिअरवर परिणाम झाला असं मला वाटत नाही." असा खुलासा त्यांनी मुलाखतीमध्ये केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Deepak Parashar clarifies gay rumors, reveals reason for divorce.

Web Summary : Deepak Parashar addressed rumors about his sexuality, clarifying he is not gay. He revealed his wife divorced him, stating she married him for fame and left with money and jewelry, causing financial hardship and spreading rumors.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा